AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray: कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात.

CM Uddhav Thackeray: कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोलाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2022 | 11:21 AM
Share

मुंबई: आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्याला आपण हे दिलेलं आपल्या कृतीतील चोख उत्तर आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला. हे काम सर्वांचं आहे. आमच्या मनात कुणाच्याही बाबत भेदभाव नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. सरकारचे नाव महाविकास आघाडी (maha vikas aghadi) आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते डाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या (gst bhavan) इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अनेकदा अनेकजण घोषणा करून नारळ फोडतात पण यातून  फक्त नारळ विक्री वाढते. आपलं तसं नाही. आज आपण प्रत्यक्ष काम सुरु करत आहोत, हा महत्वाचा फरक आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण आज चोख उत्तर  दिले आहे. आमच्यात कुठलेही भेदभाव नाहीत हे दाखवून दिले आहे. मनातील संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत अर्थबळ लागते. वस्तू आणि सेवा कर राज्य अर्थव्यवस्थेचा पाठकणा. तो मजबूत झालाच पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची बदनामी करू नका

सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

कामे मोठ्याने सांगण्याची वेळ आलीय

कायदा सुव्यवस्था चोख राखणाऱ्या पोलीस खात्याच्या अनेक सुविधांचे लोकार्पण आज होत आहे. मराठी अस्मितेचे प्रतिक असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन आणि मेट्रो लाईनचे उद्घाटन आपण करत आहोत. आपण काम करत होतो आणि आहोत. पण आता घेत असलेले कष्ट मोठ्याने सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना छेद देऊन विकास कामे लोकापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलीय, असं सांगतानाच आज भूमिपूजन होत असलेली इमारत इतकी देखणी असावी की लोकांनी ती पाहण्यासाठी यावी, देशातील जीएसटी विभागाच्या इमारतीपैकी ही इमारत सर्वात देखणी इमारत ठरावी, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra News Live Update : बारबाला आणि तिच्या बहिणीवर माजी प्रियकराचा ब्लेड हल्ला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.