cobra with its eggs : कराडात 25 ते 30 अंड्यासह सापडता कोब्रा; नागाला सोडले सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात

cobra with its eggs : कराडात 25 ते 30 अंड्यासह सापडता कोब्रा; नागाला सोडले सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात
कोब्रा
Image Credit source: tv9

कोब्रा साप गेली दहा ते बारा दिवस महादेव विठ्ठल यादव यांच्या घराजवळ वास्तव्यास होता तसेच तो त्यांच्या कुटुंबियांच्या नजरेससही पडत होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, आता हा कोब्रा पकडून डोंगरात सोडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 12, 2022 | 7:02 PM

कराड : साप म्हटलं तरी अनेकांची भंबेरी उडाललेली असते. तोंडातून शब्द फुटत नाही. त्यात जर तो साप नाग असेल तर आणि त्यातही पुढे तो जर कोब्रा असेल तर. फक्त कोब्राचे नाव ऐकलं तरी अंगाला घाम फुटतो. तर एकाच वेळी 25 ते 30 अंड्यासह कोब्रा नाग (Cobra Snakes) आढळून आला तर काय होईल? सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे सुमारे 25 ते 30 अंड्यासह कोब्रा नाग आढळून आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण (Atmosphere of Fear)होते. दरम्यान याची माहिती सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांनी देण्यात आली. आणि त्यांनी धाडसाने अंड्यांसह नागाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात (Natural Habitat) सोडले. यानंतर अख्या गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांचे आभार मानले. मात्र पकडलेला कोब्रा पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

25 ते 30 अंडी

कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथील महादेव विठ्ठल यादव यांच्या स्वप्नपूर्ती बंगल्याच्या पाठीमागच्या भिंतीजवळ दुपारीच्या सुमारास बिळामध्ये कोब्रा साप आढळून आला. याबरोबरच त्याची 25 ते 30 अंडीही याठिकाणी आढळून आली. यानंतर महादेव यादव यांनी तात्काळ सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांना त्याबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिळात असलेल्या कोब्राला तब्बल एक तास अथक परिश्रम करून सुरक्षितपणे पकडले.

हे सुद्धा वाचा

परिसरात भीतीचे वातावरण

याबरोबरच त्याची अंडी व पकडलेला कोब्रा सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला अंड्यांसह शिंदेवाडी येथील डोंगरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कोब्रा साप गेली दहा ते बारा दिवस महादेव विठ्ठल यादव यांच्या घराजवळ वास्तव्यास होता तसेच तो त्यांच्या कुटुंबियांच्या नजरेससही पडत होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, आता हा कोब्रा पकडून डोंगरात सोडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल महादेव यादव यांनी सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांचे आभार मानले. पकडलेला कोब्रा पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें