AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम? प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार?

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलणं सक्तीच करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर आता मराठीत न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम? प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार?
मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेत संभ्रम?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 12:29 PM
Share

राज्यातील रिक्षा चालक तसेच टॅक्सी चालक यांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका परिवहन मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आली होती. परंतु सुरुवातीला मराठी भाषेच्या सक्तीला अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून विरोध झाला होता. विरोध वाढल्यामुळे ज्या टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येत नाही, त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यासाठी सरकारच्या वतीने खास मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी भाषेचे वर्ग देखील घेण्यात आले. 15 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असं आधीच परिवहन मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.  दरम्यान आता मुदत संपल्याने प्रत्यक्ष अमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  जे रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक अजूनही मराठी भाषा बोतल नाहीत, त्यांच्यावरील कारवाईवरून आरटीओमध्येच संभ्रम दिसून येत आहे.  फ्लाईंग स्कॉडच्या अधिकाऱ्यांना अद्याप आरटीओ कार्यालयाकडून सूचनाच प्राप्त झालेल्या नाहीत. बुधवारी रात्री  आरटीओ कार्यालयाकडून दहा अधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात आली होती.  मात्र यातील बहुतांश अधिकारी आता फोनच उचलत नसल्याची माहिती समोर येत आहे.

कारवाईपूर्वी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याची  माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.  मात्र सकाळपासून अद्याप कोणत्याही ठिकाणी भरारी पथकाकडून कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे मराठी भाषेच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.  प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार, याकडे सर्वांचं लागलं आहे.

टॅक्सी चालकांचा विरोध 

दरम्यान काही ठिकाणी अजूनही हिंदी भाषिक टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून मराठी भाषेच्या सक्तीला विरोध होत असल्याचं चित्र आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 ऑगस्टनंतर मराठी ही बोलता आलीच पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आता जे चालक  मराठी बोलणार नाहीत, त्यांच्यावर आरटीओच्या वतीने कारवाई होणार आहे. त्यांचा परवाना देखील निंलबित होऊ शकतो.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात