काँग्रेसची दुसरी यादी : राज्यातील दोन महालढतींचं सखोल विश्लेषण

नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीनुसार, महाराष्ट्रात दोन महालढती निश्चित झाल्या आहेत. पहिली […]

काँग्रेसची दुसरी यादी : राज्यातील दोन महालढतींचं सखोल विश्लेषण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीनुसार, महाराष्ट्रात दोन महालढती निश्चित झाल्या आहेत. पहिली लढत म्हणजे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले. दुसरी लढत ही सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्यात होईल. विशेष म्हणजे सोलापुरात सध्या भाजपचा खासदार आहे. त्यामुळे भाजपदेखील ही जागा सोडणार नाही. सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र

नागपूरला कोणी संघ भूमी, तर कोणी दीक्षाभूमी म्हणून ओळखतं. मात्र नागपुरात मुस्लीम मतांचा आकडाही मोठा आहे, तर ओबीसीही कमी नाहीत. त्यामुळे इथे जातीय समीकरणाला तेवढंच महत्त्व आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार आहेत. भाजपकडून निवडणूक रिंगणात तेच उतरणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मागच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होता, तर तिसऱ्या क्रमांकावर बसपा होती. निवडणूक मैदानात पहिल्यांदाच गडकरी उतरले होते आणि त्यांची नागपुरात असलेली प्रतिमा सगळ्यांना चालणारी होती. गडकरींनी विकासकामांना महत्त्व दिलं त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो, असं विश्लेषक सांगतात.

नागपूर शहरात ओबीसींची संख्या पाहिली, तर लाखांच्या वर आहे. हलबा समाजाची संख्याही निर्णायक भूमिका निभविणारी म्हणजे 60 ते 70 हजार आहे. मुस्लीम लोकसंख्या मोठी आहे. काँग्रेसने ओबीसी उमेदवार दिला तर मते पलटली जाऊ शकतात. वंचित आघाडीचा उमेदवार असेल तर मुस्लीम आणि अनुसूचित जातींसोबतच ओबीसींची मतेही विभागली जाऊ शकतात. अनुसूचित जातीतील मतांचा मोठा गठ्ठा आहे. त्यात मागच्या निवडणुकीचा विचार केला तर बसपा तिसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे त्यांचा ठरलेला मतदार आहे. अशात जातीच्या राजकारणाचा परिणाम झाला तर मतांची विभागणी होऊ शकते. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी यांना मानणारा वर्ग सगळ्याच समाजात असल्याने  आणि त्यांचं राजकारण हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त, सोबतच त्यांनी शहराचा केलेला विकास पाहता जनता विकासाच्या बाजूने मतदान करेल, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

सोलापूर मतदारसंघाचं समीकरण काय?

2014 च्या लोकसभा निवडणुकीतला वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे. पक्षाने त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली जागा कायम ठेवण्यासाठी डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेंच्या विजयाचा मार्ग खडतर केलाय. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

जयसिद्धेश्वर महाराजांच्या संभाव्य उमेदवारीने शिंदेची वाट बिकट झालेली असतानाच त्यात आता भर पडलीय ती भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या शक्येतची. सोलापूर राखीव मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची पहिली सभा घेऊन वातावरण निर्मितीसुद्धा चांगलीच केली. शिवाय मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अनुसूचित जाती, मुस्लीम यांची मतेही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या हक्काची मते ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे शिंदेंना आपल्या पराभवाचा वाचपा काढण्याबरोबरच आपल्या हक्काची मते कशी रोखता येतील यासाठी कंबर कसावी लागणार असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जातं आहे. हे सर्व सुरु असताना त्याचा थेट फायदा भाजपाला होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

संबंधित बातमी : गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.