.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक

Vikas Lavande Attack : "गांधीजींच्या हत्येचे तुम्ही समर्थन करणार असाल तर हे निषेधार्ह आहे. पंतप्रधान जगाच्या बाहेर जातात, तेव्हा गांधीजींच्या चरणी लीन होतात. भाजप प्रणित या सर्व गुंडांचा, हल्लेखोरांचा बंदोबस्त करणे राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे"

Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक
Attack on Ncp Vikas Lavande
| Updated on: May 09, 2026 | 2:43 PM
Share

आज सकाळी आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. संग्राम महाराज भंडारे यांनी कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काळ फासलं. लवांडे यांनी गुरुवर्य साधुसंत हे घुसघोर असल्याचं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर काँग्रेसने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांच्याकडून संग्राम भंडारी हा गुन्हेगार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “भगव्या कपड्या आड ज्या पद्धतीने घुसखोर घुसल्याचे विकास लवांडे यांनी अतिशय पुराव्यासहित सिद्ध केले आहे. त्याचा प्रत्यय आज खऱ्या अर्थाने आला आहे. वारकऱ्यांच्या वेशामध्ये यांनी घुसखोरी केली आहे” असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

संग्राम बापू भंडारे नावाचा गुन्हेगार आहे. त्याने अहिल्यानगर मध्ये अशाच प्रकारचे एक स्टेटमेंट केलं होतं. त्यामुळे वाद देखील झाला होता. हा स्वतःला ह.भ.प. म्हणून घेणार असेल किंवा वारकरी संप्रदायातील म्हणून घेणारा आहे. मात्र त्याचे समर्थक काळी शाई टाकून एखाद्याला इजा करणार असतील, तर तुम्हाला कोणत्या उद्देशाने ह.भ.प.म्हणावं. वारकरी संप्रदायातील ही परंपरा आहे का? शब्दांचा विरोधात शब्दानेच केला पाहिजे” असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

त्याच्या समर्थकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो

“संग्राम बापू भंडारे नामक एक मोठा गुन्हेगार वारकऱ्यांच्या आडून हा भाजप प्रणित गुन्हेगार आहे. भंडारे याला भाजपकडून फंडिंग होतं. भाजपच्या तथाकथित गुंडाने पुरोगामी विचाराची लढाई लढणाऱ्या विलास लवांडे यांच्यावरती शाईफेक करून इजा करतो. अशा संग्राम भंडारे आणि त्याच्या समर्थकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो” असं काँग्रेसने म्हटलं आहे.

त्याला आत मध्ये टाकला पाहिजे

“सत्याची बाजू घेऊन बोलल्यावर तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे आम्ही जीवाला मुकायला तयार आहोत. पण आम्ही खऱ्याची बाजू सोडणार नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, संग्राम भंडारे नावाच्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करा.  त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्याला आत मध्ये टाकला पाहिजे” असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

मी खरं बोलावं की नाही

“माझ्या मनात सुद्धा भीती बसली आहे. मी खरं बोलावं की नाही. एखाद्याचा जीव जाणार असेल तर निश्चितपणे आयुष्याच्या शेवटपर्यंत आमचा जीव गेला तरी आम्ही खरं बोलणार. असे संग्राम बापू भंडारे किती जरी आले, तरी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करू. विचारांचा विरोध हा विचारांनी झाला पाहिजे” असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर