AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला मोठं खिंडार? तब्बल 40 आमदार भाजपाच्या वाटेवर; काँग्रेसच्या दाव्याने मोठी खळबळ!

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या "राष्ट्रवादीचे २४ आमदार भाजपमध्ये जातील" या दाव्याला दुजोरा देत खळबळजनक माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीला मोठं खिंडार? तब्बल 40 आमदार भाजपाच्या वाटेवर; काँग्रेसच्या दाव्याने मोठी खळबळ!
sunetra pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 18, 2026 | 5:12 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सध्या सर्व काही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच पक्षाचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. त्यातच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याच्या चर्चा आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “राष्ट्रवादीचे २४ आमदार भाजपमध्ये जातील” असा खळबळजनक दावा केला होता. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रोहित पवारांच्या दाव्याला दुजोरा देत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“राष्ट्रवादी नक्की चालवतंय कोण?”

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल पटेल? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या तीव्र अंतर्गत कलह माजला असून हा पक्ष लवकरच फुटणार आहे.”

पुढे बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचे समर्थन केले आणि सांगितले की, रोहित पवारांकडे तब्बल 40 लोकांची नावे आहेत जे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘देशात विरोधी पक्षच राहणार नाही’ असे म्हटले होते, त्याचाच हा भाग आहे. सत्तेत गेल्यावर हे लोक फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत, असेही लोंढे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंपेक्षा मोदींची संसदेतील उपस्थिती कमी”

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील कमी उपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लोंढे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची उपस्थिती कमी होती हे जरी खरे असले, तरी पंतप्रधान मोदींची संसदेतील उपस्थिती त्याहूनही कमी आहे, असा दावा त्यांनी केला. “पंतप्रधान फक्त टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?