AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात

मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेत्याच्या हत्येचा कट रचन्यात आला होता, या प्रकरणात पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतलं आहे.

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात
| Updated on: Dec 26, 2024 | 3:38 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते देखील शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. लग्न सोहळ्यातच त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्नना सुपारी दिल्याची माहिती किणीकरांना समजली होती.  माहिती मिळाल्यानंतर बालाजी किणीकरांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यत घेण्यात आलेले दोघे शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र या प्रकरणात  आमदार बालाजी किणीकर आणि पोलिसांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात त्यांच्या हत्येचा कट होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार 

बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर गटबाजीतून हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. लग्न सोहळ्यातच त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्नना सुपारी दिल्याची माहिती किणीकरांना समजली होती, त्यांनी या प्रकरणाची माहिती तातडीनं पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल