दोन बड्या नेत्यांमध्ये व्यासपीठावर तू-तू, मैं-मैं, दमही भरला, टिंगलही केली

दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार घोडीले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु झाला.

दोन बड्या नेत्यांमध्ये व्यासपीठावर तू-तू, मैं-मैं, दमही भरला, टिंगलही केली
चंद्रकांत खैरे संदिपान भुमरे
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 11:38 AM

महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या वळणावर आले आहे. महाराष्ट्रातील या बदलत्या राजकारणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदर्श राजकीय परंपरेला तडा जाणारा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. दोन्ही शिवसेना पक्षातील आजी माजी खासदारांमध्ये जबरदस्त वाद झाला आहे. व्यासपीठावर त्यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली. दमही भरला गेला. टिंगलही करण्यात आली. खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात हा प्रकार घडला.

काय घडला प्रकार

दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार घोडीले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांनी केला. त्यानंतर भर व्यासपीठावर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरु झाली. प्रोटोकॉल का पाळत नाही? असा प्रश्न संदीपान भुमरे यांनी विचारला. तर चंद्रकांत खैरे यांनाही संदीपान भुमरे यांनी दम भरला. त्यानंतर संदीपान भुमरे यांच्याकडून पुस्तक आडवे लावत चंद्रकांत खैरे यांची टिंगल करण्यात आली.

शिवसेनेतील बंडानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे शिवसेनेत होते. शिवसेनेतील बंडानंतर खैरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर भुमरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेहमी आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा भुमरे यांनी पराभव केला होता.

हे सुद्धा वाचा

तो पराभव चंद्रकांत खैरे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागला. त्यानंतर दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करत राहिले. परंतु आता व्यासपीठावर सर्वांसमोर त्यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली. या प्रकाराची चांगलीच चर्चाही रंगली.  आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर शिवसेनेच्या या दोन गटातील वाद अधिकच रंगणार आहे.

छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.