कोरोनामुळे साखरपुड्यातच लग्न उरकलं, वाचलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

कोरोनाचा इफेक्ट लग्न समारंभात देखील दिसून येत (corona virus terror) आहे. बीडच्या वडवणी येथे आज (15 मार्च) मयूर आंधळे यांचा साखरपुडा होता.

कोरोनामुळे साखरपुड्यातच लग्न उरकलं, वाचलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

बीड : कोरोनाचा इफेक्ट लग्न समारंभात देखील दिसून येत (corona virus terror) आहे. बीडच्या वडवणी येथे आज (15 मार्च) मयूर आंधळे यांचा साखरपुडा होता. पण कोरोनाच्या वाढत्या दहशतीमुळे सरकारने गर्दीचे कार्यक्रम तसेच लग्न समारंभ पुढे ढकलण्यास सांगितले आहे. त्यामुळे आंधळे कुटुंबियांनी साखरपुड्यातच लग्न (corona virus terror) उरकून घेतलं.

मयूर आंधळे यांनी लग्न केल्यानंतर कोरोना व्हायरसची जनजागृतीही केली. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली. लग्न समारंभात पाहुण्यांची होणारी वर्दळ लक्षात घेऊन त्यांनी हे लग्न केलं.उद्या (16 मार्च) जिल्हाधिकारी राहुल रेखावार त्यांच्याकडे ते एक लाखांचा धनादेश सुपूर्द करणार आहेत.

नुकतेच वाशिममध्येही कोरोनाच्या भीतीने साखरपुड्यातच लग्न उरकण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील वर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वधू यांचा 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे साखरपुडा होता. मात्र कोरोनामुळे लग्नास बंदी आल्यास लग्न पुढे ढकलून घ्यावे लागेल. या भीतीपोटी साखरपुड्यात लग्न उरकले.

वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील शुभम रामकिसनराव देशमुख आणि यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग इथल्या दिपाली कैलासराव कदम याचं लग्न येत्या 14 मे रोजी ठरलं होतं. त्यानुसार 8 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे त्यांचा साखरपुडा होता. मात्र, दोन्ही परिवारांना देशात कोरोना विषाणूमुळे दहशत असल्याचं माहित होतं. त्यामुळे त्यांनी पुसद येथील जेष्ठ नागरिक भवनात साखरपुड्यातच लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या : 

कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : पुणे विभागीय आयुक्त

Corona | एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना

CORONA : शिर्डी, अंबाबाई, सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरली

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘कलम 144’ लागू, सामूहिक पर्यटनाला बंदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *