राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर

राज्यात आज (23 एप्रिल) दिवसभरात तब्बल 778 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 427 वर पोहोचला आहे (Corona Patients in Maharashtra).

राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 9:58 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Corona Patients in Maharashtra). राज्यात आज (23 एप्रिल) दिवसभरात तब्बल 778 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 427 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 6, पुण्यातील 5, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे (Corona Patients in Maharashtra).

राज्यात आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरुष तर 6 महिला आहेत. यापैकी 9 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आहेत. 2 रुग्ण हे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील आहेत. 2 रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. उर्वरित 12 रुग्णांपैकी 7 रुग्णांमध्ये (58 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 283 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत 840 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात 96 हजार 369 जणांच्या तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 89 हजार 561 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आला आहे. तर 6 हजार 427 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 8,702 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 4,77 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7,491 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 27.26 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यानुसार आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 4205 374 167
पुणे (शहर+ग्रामीण) 853 125 60
पिंपरी चिंचवड 52 12 2
ठाणे (शहर+ग्रामीण) 248 20 6
नवी मुंबई 97 22 4
कल्याण डोंबिवली 124 31 3
उल्हासनगर 2 1
भिवंडी 8 2
मीरा भाईंदर 116 5 2
पालघर 21 1 1
वसई विरार 109 18 3
रायगड 14 5 0
पनवेल 36 13 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 11 2
मालेगाव 109 9
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 32 16 2
धुळे 17 2
जळगाव 8 1 2
नंदूरबार 7 1
सोलापूर 33 3
सातारा 20 3 2
कोल्हापूर 9 2
सांगली 26 27 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 7 2 1
औरंगाबाद 40 14 5
जालना 3
हिंगोली 7 1
परभणी 1
लातूर 8 8
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 1
अकोला 20 1 1
अमरावती 7 1
यवतमाळ 17 8
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1
नागपूर 100 12 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 21 2
एकूण 6427 840 283

संबंधित बातम्या :

पुण्यात तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 1500 तर 15 मेपर्यंत 3 हजार होण्याची शक्यता : आयुक्त

लॉकडाऊनदरम्यान ज्वेलर्ससमोर खड्डा खणला, खुदाई करत करत भुयार बनवून ज्वेलर्स लुटलं

नगरमध्ये 4 निगेटिव्ह रुग्णांची कोरोना चाचणी 14 दिवासांनी पॉझिटिव्ह

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.