Breaking News | ‘तिसरी लाट आली, जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर,’ बड्या मंत्र्याची माहिती

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिली आहे.

Breaking News | 'तिसरी लाट आली, जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर,' बड्या मंत्र्याची माहिती
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 12:03 PM

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

शाळा, मुंबई लोकल अशा सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीला कोरोनाची तिसरी लाट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले.

कोरोना नियमांची पायमल्ली केल्यास कठोर कारवाई 

राज्यात  कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून  सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

इतर बातम्या :

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या; आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

Children Vaccination: उद्यापासून कोविन अ‍ॅपवर मुलांच्या लसीसाठी नोंदणी, औरंगाबादेत 2 लाख 13 हजार डोसचे उद्दिष्ट

Sanjay Raut | मुनगंटीवार म्हणाले शिवसेनेशी युती म्हणजे ऐतिहासिक चूक, आता संजय राऊतांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.