Omicron: इगतपुरीतील आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोना, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमूने पाठवणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे

Omicron: इगतपुरीतील आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोना, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमूने पाठवणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ओमिक्रॉनबाबत खबरदारी घेण्याकरिता या विद्यार्थ्यांचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 10, 2021 | 3:18 PM

नाशिकः राज्यभरातील कोरोना रुग्णांची (Corona) संख्या नियंत्रणात असताना नाशिक जिल्ह्यातील (Nashik Corona) रुग्णसंख्येत मात्र आतापर्यंत फारशी घट झालेली दिसून आली नाही. त्यातच आता इगतपुरीच्या मुंढेगाव येथील आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात ओमिक्रॉनच्या (Omicron) धर्तीवर खबरदारी घेण्यात येत असल्याने त्यांचे नमूने जिनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुलांच्या लसीकरणासाठी शासन उत्सुक

दरम्यान, राज्यभरातील शाळा येत्या काही दिवसात पूर्णपणे सुरु होत असून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय झालेला नाही. तसेच ओमिक्रॉनपासून बचावासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरू शकतो, असाही एक सूर आहे. या विषयी प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्रीय औषध मानक तज्ज्ञांच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. त्यानंतर राज्यात बूस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय होईल. मुलांच्या लसीकरणाचा निर्णय झाल्यास महाराष्ट्रात त्याचे स्वागतच होईल. अर्थात लसीकरणासाठी गावपातळीवर सरपंचांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.

वडवणीतून अहमदनगरला निघालेले 22 पैकी 19 रुग्ण पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यातील वडवणी येथून बहुतांश जण अहमदनगर येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी जात असतात. गुरुवारी वडवणी येथून 22 जण अहमदनगरकडे शस्त्रक्रियेसाठी निघाले होते. मात्र त्यापैकी तब्बल 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली. या रुग्णांवर वडवणीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

शिर्डीत गुंडगिरी वाढली!! पहाटे साडे तीन वाजता तरुणावर गोळीबार, काय झाला वाद?

सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें