Corona Update : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

आता एक मोठी अपडेट आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता आज टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे.

Corona Update : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक
मास्कImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 4:28 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी (Coorona Update) पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. कोरोनचे रुग्ण वाढल्यास राज्यात मास्क सक्ती (Mask) होऊ शकते, असे सूचक विधान सकाळीच अजित पवारांनी (Ajit Pawar) केले होते. त्यातच आता एक मोठी अपडेट आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता आज टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच्या निर्णयाकडे आपले लक्ष असणार आहे.

आकडेवारीवर यंत्रणा लक्ष ठेवून

कोरोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहोत असेही अजित पवार म्हणाले. आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांची सकाळची प्रतिक्रिया

कालची मुंबईतील कोरोना आकडेवारी

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील काही महिन्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. राज्याती आणि मुंबईतील आकडेवारीही वाढत आहे. त्यामुळे नेत्यांकडूनही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र रुग्णसंख्या अटोक्यात ठेवण्यासाठी काही कठोर निर्णयही मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर घेतले जाऊ शकतात. मास्क सक्तीबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना नियम शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. तसेच लोकांनाच निष्काळजीपणाही वाढला आहे. मात्र त्यामुळे पुन्हा काही निर्बंधांना समोरे जावं लागू शकतं. हे टाळायचं असल्यास वेळीच योग्य ती खबरदारी घेण गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.