AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविन ॲपमध्ये अडचण आल्यास ऑफलाईन पद्धतीने लसीकरण, उस्मानाबादच्या आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी यांना मोबाईलवर sms पाठविण्यात आले आहेत . (Corona vaccination should be done offline)

कोविन ॲपमध्ये अडचण आल्यास ऑफलाईन पद्धतीने लसीकरण, उस्मानाबादच्या आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
Corona-vaccine
| Updated on: Jan 18, 2021 | 9:45 PM
Share

उस्मानाबाद : राज्यात कोरोना लसीकरणाला उद्यापासून पुन्हा एकदा सुरुवात सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आल्यास ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी याबाबतची माहिती दिली. (Corona vaccination should be done offline if there is problem with the Covin app)

कोरोना लसीकरणासाठी मंगळवारीपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. मात्र लसीकरणादरम्यान कोविन हे ॲप बंद पडले किंवा त्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येईल. नुकतंच आरोग्य यंत्रणेला याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. उस्मानाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे याबाबतची माहिती दिली.

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांच्या बैठकीत कोविन ॲपबाबत चर्चा झाली. त्यावेळी जर ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास कोणत्याही स्थितीत लसीकरण करावे. लसीकरणासाठी आलेल्यांना परत पाठवू नये. कोरोना ऑफलाईन माहिती ऑनलाईन करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने कोरोना लसीकरणच्या ऑफलाईन पद्धतीला नकार दिला होता. मात्र आता राज्याने ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्याचे आदेश दिले आहे. उद्याच्या लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी यांना मोबाईलवर sms पाठविण्यात आले आहेत .

दरम्यान कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायू दुखी यासारखे प्रतिकुल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. (Corona vaccination should be done offline if there is problem with the Covin app)

संबंधित बातम्या : 

कोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन

Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणा

कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.