Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट; एका दिवसात 4 हजार पेक्षा जास्त रुग्ण; चिंता वाढली

मुंबईः राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा काही जिल्ह्यातून कालपर्यंत कमी होत असल्याचे दिसत असतानाच आज मात्र राज्यात तब्बल 4024 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ज्या प्रकारे राज्यातील आकडा भीतीदायक आहे त्याचप्रकारे मुंबईतील कोरोना (Mumbai Corona Update) रुग्णांची आकडाही कमालीचा वाढला आहे. आरोग्य विभागाने आज कोरोना रुग्णांचा अहवाल जाहीर करताच आरोग्य अधिकाऱ्यांसह राज्य सरकारचं टेन्शन […]

Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट; एका दिवसात 4 हजार पेक्षा जास्त रुग्ण; चिंता वाढली
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 12:52 AM

मुंबईः राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा काही जिल्ह्यातून कालपर्यंत कमी होत असल्याचे दिसत असतानाच आज मात्र राज्यात तब्बल 4024 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ज्या प्रकारे राज्यातील आकडा भीतीदायक आहे त्याचप्रकारे मुंबईतील कोरोना (Mumbai Corona Update) रुग्णांची आकडाही कमालीचा वाढला आहे. आरोग्य विभागाने आज कोरोना रुग्णांचा अहवाल जाहीर करताच आरोग्य अधिकाऱ्यांसह राज्य सरकारचं टेन्शन दुप्पट वाढलं आहे. मागील आठवड्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार आणि लसीकरणावर (Covid Dose) भर देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य खात्याकडूनही देण्यात आल्या होत्या.

कोरोनाची 36 टक्क्यांनी वाढ

राज्यात बुधवारी 4024 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या आकडेवारीपेक्षा हा आकडा 36 टक्क्यांनी वाढलाह होता, कोरोनाबाधितांचा हा आकडा वाढला असला तरी मृत्यूदर प्रमाण मात्र कमीच राहिले आहे, या काळात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाच महिन्यानंतर विक्रमी नोंद

राज्यातील ही आकडेवारी वाढत असतानाच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पाच महिन्यानंतर विक्रमी नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणावरही याचा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तरी मृत्यूदर कमी

महाराष्ट्रातील आजचा आकडा हा 4024 होता तर बुधवारी 2293 नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूदर कमी असून या काळात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्याच्या 23 तारखेनंतर ही एवढी रुग्णसंख्या पहिल्यादांच समोर आली आहे.

 बी. ए. 5 व्हेरिएंटचे संक्रमण

बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी बी. ए. 5 व्हेरिएंटचे संक्रमण झालेले एकूण चार रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण सापडले असले तरी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रशासन आता खडबडून जागे

एका दिवसात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाल्यामुळे आरोग्य प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी आता बीएमसीने जंबो कोविड सेंटर मेडिकल स्टाफसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.