AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर मायलेकीची हत्या प्रकरण, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

हा आरोपी धर्म आणि जातीनुसार आपली नाव बदलून महिलांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक करत होता.

पालघर मायलेकीची हत्या प्रकरण, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
| Updated on: Dec 21, 2020 | 11:40 AM
Share

पालघर : बोईसर येथील दुहेरी महिला हंत्याकांडातील दोन आरोपींना अटक (Palghar Double Murder Case Accused) करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे (Palghar Double Murder Case Accused).

हा आरोपी धर्म आणि जातीनुसार आपली नाव बदलून महिलांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक करत होता. बोईसर येथील पास्थळ येथील माय लेकींच्‍या दुहेरी हत्या प्रकरणात बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अटक केली, तर दुसऱ्या सहआरोपीलाही पोलिसांनी ही अटक केली आहे.

पास्थळ येथील छाया निवास या सदनिकेत मागील आठवड्यात लक्ष्मी पवार (वय 50) आणि तिच्या मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपासात सदर महिलेच्या पती आणि दुसरा सहआरोपीकडून या दोन्ही माय लेकींची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आपल्या बनावट नावासह या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही महिलांसोबत राहत होता. यापूर्वी देखील त्याने खोट्या नावाचा आसरा घेऊन एका मुस्लिम महिलेची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन्ही आरोपीला न्यायालयात हजर केलं असता दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप हत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच, या आरोपीने आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Palghar Double Murder Case Accused

संबंधित बातम्या :

आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट

महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे

घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

नात्याला काळिमा! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.