मूठभरांची सत्ता जावो, आणि प्रजेची सत्ता येवो…सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका, आजच्या सामनातून कोणावर निशाणा?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 8:56 AM

आजच्या दिवशी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम होतील, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, सैनिकांची प्रात्यक्षिके होतील मात्र खरंच प्रजेचं राज्य आले आहे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

मूठभरांची सत्ता जावो, आणि प्रजेची सत्ता येवो...सामनातून शिंदे-भाजप सरकारवर जळजळीत टीका, आजच्या सामनातून कोणावर निशाणा?
Image Credit source: TV9 Network

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जळजळीत टीका करण्यात आली आहे. मूठभरांची जावो, आणि प्रजेची सत्ता येवो अशा शीर्षकाखाली हा आजचा सामनाचा अग्रलेख आहे. निवडणूक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता जनता उपाशी असे भेसूर चित्र प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी ते बदलावेच लागेल असं म्हणत पहिल्याच ओळीत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी आता देशातील प्रजेलाच एकजूट दाखवावी लागेल असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भ देऊन अग्रलेखातून सत्तांतर घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन चिरायू ठेवायचा असेल तर मूठभरांची जावो आणि प्रजेची सत्ता येवो हे राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल असं म्हणत सामनातून जळजळीत टीका करण्यात आली आहे.

हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशातील मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येऊ अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाचा संदर्भ देऊन सामनातून सत्ता उलटवून टाकण्यासाठी देशातील प्रजेने एकजूट दाखवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

आजच्या दिवशी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम होतील, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, सैनिकांची प्रात्यक्षिके होतील मात्र खरंच प्रजेचं राज्य आले आहे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक होऊन देशात अनेक चांगले बदल झाले, अनेक क्रांत्यांचा संदर्भ देऊन मोठ्या शहरात भल्या मोठ्या चकमकीत इमारती झाल्या म्हणजे मोठा बदल झाला असे नाही, खंडप्राय देशाची खरंच प्रगती झाली का? असाही हल्लाबोल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होत चालले आहे आणि गरीब आणखी गरीब होत चालले आहे, ही विषमतेची दरी घटनाकारांना अपेक्षित होती का? असा थेट सवाल सामनातून करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI