‘कोरोनाला नंतर बघू, आधी लॉकडाऊनचा बंदोबस्त करु’, डी मार्टबाहेर खरेदीदारांची त्सुनामी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अनेकांना पुन्हा लॉकडाऊन लागू होईल, अशी भीती वाटत आहे (Crowd in D Mart in Kalyan due to fear of lockdown).

'कोरोनाला नंतर बघू, आधी लॉकडाऊनचा बंदोबस्त करु', डी मार्टबाहेर खरेदीदारांची त्सुनामी

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अनेकांना पुन्हा लॉकडाऊन लागू होईल, अशी भीती वाटत आहे. याच भीतीपोटी शेकडो कल्याणकर डी मार्टला खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे डी मार्टबाहेर खरेदीदारांची प्रचंड गर्दी उसळलेली बघायला मिळत आहे. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे (Crowd in D Mart in Kalyan due to fear of lockdown).

कल्याणमध्ये गेल्या चार दिवसांपासून रुग्ण वाढले

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून विनामास्क फिरणारे नागरीक, गर्दी करणारे दुकानदार यांच्या विरोधात पोलीस आणि महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे (Crowd in D Mart in Kalyan due to fear of lockdown).

डी मार्टवर याआधीदेखील कारवाई

दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. ही माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी डी मार्ट विरोधात कारवाई करीत व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गर्दी काही कमी झाली नाही. त्यानंतर आज देखील डी मार्टबाहेर खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. याबाबत जेव्हा ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीने नागरीकांशी संवाद साधला तेव्हा नागरीकांचे एकच म्हणणे होते की, लॉकडाऊन लागू होणार अशी चर्चा आहे. यासाठी आम्ही खरेदी करीत आहोत.

…तर डी मार्ट सील करणार, महापालिका आयुक्तांचा इशारा

इतकेच नाही तर रिक्ष चालक सुद्धा गर्दी पाहून हैराण आहेत. त्यांचे पण म्हणणे आहे की, लॉकडाऊनच्या अफवेमुळेच ही गर्दी होत आहे. डी मार्टला महापालिकेने दहा हजार रुपयांचा दंड लावला. पुढे उद्या हीच परिस्थिती राहिल्यास डी मार्ट सील करण्याची कारवाई होणार, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये आठवडी बाजार, हजारोंची गर्दी, आयुक्तांचा एक फोन आणि शुकशुकाट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI