AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय… तो वादाचा मुद्दा राधा पाटीलने खोडून काढला..

Radha Patil Dance : नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अश्लील डान्स केल्याचा आरोप केला जात आहे. या वादावरच आता नृत्यांगना राधा पाटीलने आपली भूमिका मांडली. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय... तो वादाचा मुद्दा राधा पाटीलने खोडून काढला..
Radha Patil
| Updated on: Sep 09, 2026 | 4:57 PM
Share

मुंबई, पुणे आणि साताऱ्यासारख्या शहरांमध्ये नृत्यांगनांना नाचवल्याने मोठा वाद निर्माण झाला. दहीहंडीसारख्या कार्यक्रमांना नृत्यांगनांना नाचवल्याने अनेकांनी टीका केली. नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अश्लील डान्स केल्याचा आरोप केला जात आहे. या वादावरच आता नृत्यांगना राधा पाटीलने आपली भूमिका मांडली. नृत्यांगना राधा पाटील हिने म्हटले की, महिलांच्या डान्समध्ये एक तरी स्टेप असतेच कंबर हालवण्याची. पण आता लोक त्यावरूनच टीका करत आहेत. कोणताही मुद्दा घेऊन जज केले जाते. आम्ही तरी किती सहन करायचे. आम्हाला पण काही प्रॉब्लेम आहेत. आम्ही लोकांसमोर बोलत आहेत. लावणी मी दहीहंडीत जो डान्स केला तो मान्य आहे. आम्ही पाश्चात्य डान्स करत होतो. लावणी आणि वेस्टर्न डान्स आम्ही करत होतो.

महाराष्ट्राचा बिहार झाला, असे अनेकांना वाटते. माझ्या कार्यक्रमात सर्व मराठीच गाणी असतात. मी हिंदी गाण्यावर डान्स केला नाही. बाकीचे लोक हिंदी गाण्यावर डान्स करतात, ते दिसत नाही. माझा मुद्दा धरला जातोय आणि ताणला जातोय. साडी नेसल्यावर ब्लाऊज, कंबर दिसणे सामान्य आहे. मी वैयक्तीक सांगते, कधीही अश्लील हातवारे केले नाहीत. अश्लील हावभाव केलेला व्हिडीओ दाखवा.

यादरम्यान राधा पाटील हिने टीका करणाऱ्यांना मोठा प्रश्न विचारला. राधा पाटील हिने म्हटले की, पाटील आडनाव असल्याने मला टार्गेट केले केले जात आहे का? एका पाटीलने घाण केली आहे म्हणजे दुसरीही पाटील घाण करेल? मी अश्लील डान्स केलेला नाही. एकतरी वेगळी घाणेरडी हालचाल दाखवा. राधा पाटील हिने थेट गाैतमी पाटीलला टोला लगावला हे.

गुन्हा दाखल झाला तो माझ्या ग्रुपचा शो झाला होता. माझी एट्री झाली होती. परवानगी नव्हती तर आजचं का झालं कळतं नाही. माझ्यावर प्रेम करणारी पब्लिक मला थांबवणार नाही. कायदेशीर प्रोसेस करणार आहोत. मी स्वत: प्रमाणपत्र आणि पोलिस परमिशन आम्ही बघणार आहोत, असेही राधा पाटील यांनी म्हटले.

Follow Us
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार