Dhananjay Munde Shayari : हम आंधीयो में भी चिराग… धनंजय मुंडेंनी शायरीद्वारे मांडले दु:ख
गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायींना कोणी संपवू शकत नाही. हा विचार घेऊन आलेल्या मुंडेसाहेबांच्या अनुयायीला कोणीही दहा जन्म संपवू शकत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी धनंजय मुंडेंनी शायरीद्वारे मनातील खदखद व्यक्त केली.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपारिक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यातील दुसरा महत्त्वाचा दसरा मेळावा म्हणून याकडे पाहिले जात आहे. या मेळाव्यावेळी धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केले. आजचा मेळावा हा मुंडे साहेबांच्या दसरा मेळाव्यातील अभूतपूर्व मेळावा आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायींना कोणी संपवू शकत नाही. हा विचार घेऊन आलेल्या मुंडेसाहेबांच्या अनुयायीला कोणीही दहा जन्म संपवू शकत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी धनंजय मुंडेंनी शायरीद्वारे मनातील खदखद व्यक्त केली.
मैने सोचा की इस सफर खामोश रहना ठिक है….
मी बरेच दिवस झालो ताई बोललोच नाही. मैने सोचा की इस सफर खामोश रहना ठिक है. न कुछ करते हूए बिना वजह गालिया खाई है. मी विद्यार्थी दशेपासून ज्या ज्या जातीचा आरक्षणाचा मुद्दा आला, त्यांच्यासाठी भांडणारा मी कार्यकर्ता आहे. हे तुमच्यापासून लपलेलं नाहीये, असे धनंजय मुंडे म्हणाले.
एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगतोय
काही लोक राजकारण करत आहे. सरकारने आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आहे. आताही करत आहे. आरक्षण दिलंय. आणखी द्या. काही म्हणणं नाही. पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका. मी २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं. त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला. माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टात गेले. कोर्टाने मला क्लीनचिट दिली. जे कोर्टात गेले. त्यांना लाख रुपयाचा दंड ठोठावला. एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या, असेही धनजंय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी म्हटलेल्या शायरी
यानंतर भाषणाच्या शेवटी धनंजय मुंडेंनी सलग दोन शायरी म्हटल्या. यातील पहिल्या शायरी त्यांनी जवळच्या मित्राचा उल्लेख केला. यातून त्यांनी त्यांचा एकटेपणा आणि संघर्षाबद्दल भाष्य केले.
आग लगी थी… मेरे घर में सब जानने वाले आये, हाल पुछा और चले गये. एक सच्चे दोस्त ने पूछा -: ‘क्या क्या बचा है… ?’ मैने कहा -: ‘कुछ नहीं, सिर्फ मैं बच गया हूँ…!!’ उसने गले लगाकर कहा -: ‘साले! फिर जला ही क्या है।'”
यानंतर त्यांनी तिसरी आणि भाषणातील शेवटची शायरी म्हटली. यातून त्यांनी संकटांशी दोन हात करण्याचा आणि लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “हर मुश्किल को हंसते हंसते झेलते है हम, हम आंधीयो में भी चिराग जलाते चलते है.” अशी शायरी त्यांनी यावेळी म्हटली.
