AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी, एकूण 25 अटी, पण 16 व्या अटीने वाढवलं टेन्शन; आता काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. महापालिकेने या मेळाव्यासाठी एकूण 25 अटींसह परवानगी दिली आहे. यापैकी 16 व्या अटीने ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे.

ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी, एकूण 25 अटी, पण 16 व्या अटीने वाढवलं टेन्शन; आता काय?
Dasara Melawa
| Updated on: Sep 10, 2025 | 5:49 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या मेळाव्याच्या तयारीला सुरुवात होणार आहे. महापालिकेने या मेळाव्यासाठी एकूण 25 अटींसह परवानगी दिली आहे. यापैकी 16 व्या अटीने ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. या सर्व अटी नेमक्या कोणत्या आहेत? 16 व्या अटीत नेमकं काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खालील अटी-शर्थीद्वारे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी

1. आपणांस मैदानाचा वापरासाठी रु. 250+ 18% (जीएसटी सीजीएसटी)। (प्रत्तिदिवशी रु. 250+18% (जीएसटी + सीजीएसटी) परवाना शुल्क भरावे लागेल.

2. आपणास Notice Of Motion No. 666 of 2015 अन्वये मा. न्यायालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे लागेल.

3. आपणास शासन निर्णय क्र. बीएमसी -2515/प्र.क्र. 1270/नवि-21 दि. 20.01.2016 मधील अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.

4. आपणास The Noise Polution (Regulation and Control) Rule 2000 मधील तरतुदींचे पालन करावे लागेल.

5. आपणास कार्यक्रमासाठी संबंधित पोलिस स्टेशनची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी सुद्धा पोलिस स्टेशनची परवानगी घ्यावी लागेल.

6. आपणास मा. उच्च न्यायालयाने जनहीत याचिका क्र. 173/2010 दि. 13.03.2015, 24.06.2015, 17.07.2015 आणि 10,11,12 व 16 ऑगस्ट 2016 अन्वये पारित केलेल्या आदेशांचे पालन करावे लागेल.

7. आपणास मुख्य अग्निशमन अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आपणांस बंधनकारक आहे

8. आपणास स्ट्रक्चरल इंजिनियर यांचे स्टॅबिलिटि प्रमाणपत्र घेणे आपणांस बंधनकारक आहे.

9. आपणास मा. उच्च न्यायालय / शासनाच्या तसेच महानगरपालिकेच्या सर्व अटी व शर्तीचे उल्लंघन करणार नाही अशा आशयाचे रु. 500/- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र सादर करावे लागेल.

10. मैदानाबाहेर कार्यक्रमाचा आवाज ऐकू जाणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच मा.उच्च न्यायालयाने नोटीस ऑफ मोशन क. (NOMLoding No. 10-2013) PIL No. 116/2009 अन्वये दिलेल्य आदेशानुसार ध्वनीक्षेपकांच्या वापराने ध्वनी प्रदूषणाच्या कोणत्याही तक्रारीस कोणासही वाव मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.

11. कार्यक्रम संपल्यानंतर मैदान पूर्ववत स्थितीत करून द्यावे लागेल,

12. कार्यक्रमा दरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारच्या वाहन प्रवेशास सक्त मनाई असेल.

13. मा. उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानासंबंधी वेळोवेळी दिलेले आदेश व घातलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.

14. घनकचरा विभागास कोणत्याही प्रकारचे साफसफाई शुल्क देय असल्यास ते आपणांस मुख्य पर्यवेक्षक घनकचरा जी/उत्तर विभागास भरावे लागेल.

15. रात्री 10.00 नंतर कोणत्याही प्रकारच्या सभेस / कार्यक्रमास परवानगी नाही याची नोंद घ्यावी.

16. सदर दिवशी शासनाने / महापालिकेने कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास आपली परवानगी रद्द करण्यासापेक्ष देण्यात येत आहे.

17. मैदानाचे कोणतेही नुकसान किंवा मैदानाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास आपण भरलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.

18. सदर कार्यक्रमांची सर्व प्रकारची व्यवस्था आपण आपल्या खचनि करावयाची आहे.

19. कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारे मंडप/पंडाल/स्टेज कार्यक्रम संपल्याबरोबर त्वरीत काढून टाकून मैदान पूर्ववत स्थितीत करून द्यावे.

20. अटींचे उल्लघंन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपणाविरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.

21. शिवाजी पार्क मैदानाच्या कोणत्याही भागास कोणत्याही प्रकारची क्षती झाल्यास तो भाग दुस-या दिवसापासून वापरता येईल अशारीतीने आपण पूर्वस्थितीत करून देण्यात यावा.

22. मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजविण्यास परवानगी नाही, याची नोंद घ्यावी.

23. अर्जदारास रुपये 20,000/- अनामत रक्कम भरावी लागेल.

24. मैदानाचे कोणतेही नुकसान / गैरवापर / अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास आपण भरलेली अनामत रक्कम रू. 20,000/- जप्त करण्यात येईल व पुढील वर्षी आपणांस परवानगी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

25. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या क्र. एमपीसीबी/जीडी (एपीसी) / टीवी/बी-०२९७ दि.20.03.2024 यांच्या मार्गदर्शक सुचना अन्वये आपणास कोणत्याही प्रकारची माती छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात टाकता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

वरील व्यतिरिक्त इतर काही अटी ठरविण्यात आल्यास त्या आपणांस कळविण्यात येईल व त्यांचे पालन करणे आपणास बंधनकारक राहील.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.