AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली…, तुम्हालाही अश्रू नाही आवरणार

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे, यावर आता त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली..., तुम्हालाही अश्रू नाही आवरणार
Vaibhavi deshmukh
| Updated on: Mar 06, 2025 | 7:02 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. वडिलांचे फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या वैभवी देशमुख?

हे दुःख कधीच संपणार नाही, ते आमच्या घरातील प्रमुख व्यक्ती होते. हे दुःख कधीच आमच्या मनातून जाणार नाही. फोटो बघितल्यानंतर आमच्या कुटुंबाची लढण्याची क्षमता संपून जात आहे, आमची सहनशीलता संपत आहे. दुःख त्या दिवशी सुद्धा तेवढंच होतं आज आणि यापुढेही तेवढेच राहणार आहे. आम्ही आता दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत, माझ्या वडिलांना न्याय द्यायचा आहे. हे सगळं कोण घडवून आणतय हा प्रश्न आमच्या समोर सुद्धा आहे. जे फोटो आहेत त्यामध्ये माझ्या वडिलांना अमानुष पद्धतीने मारहाण केली, मृतदेह तुमच्यासमोर असताना तुम्ही हसताय धिंगाणा करताय, त्यांच्यासमोर फोटो काढताय त्याचं आम्हाला किती दुःख आहे.

मला माझ्या गावासाठी आणि मुला – मुलींसाठी जगू द्या हे शब्द ऐकल्यानंतर अश्रू अनावर होत आहेत. आज ते घरी येत नाहीत तरी आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट पाहतोय, ते घरी येत नाहीत. आता आम्ही वाट कुणाची बघायची ते घरी येत नाहीत हा प्रश्न आहे. ही घटना खंडणीमुळे झाली आहे, ते लोक इतके अमानुषपणे कृत्य करतात, त्याच्यामागे कोणाचा हात आहे. जी खंडणी जाते ती नेमक कोणासाठी जाते, ती कोणापाशी जाते, हे जे लोक करण्यासाठी आले होते त्यांना कोणी पाठवलं होतं? असा सवाल वैभवी देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बारामतीमध्ये जो मोर्चा होतोय त्या मोर्चात कुटुंबीय सहभागी होणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आमची विनंती एकच आहे लवकरात लवकर न्याय द्या, जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, असं वैभवी देशमुख यांनी म्हटलं आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.