वाघाचा राहुटीतील मेंढपाळ कुटुंबावर हल्ला, मेंढपाळांनी दिली वाघाशी झुंज, अखेर…

वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर म्हशीच्या कळपासोबत वाघाची झुंज झाली. वनविभागाला या घटनेची माहिती गेली.

वाघाचा राहुटीतील मेंढपाळ कुटुंबावर हल्ला, मेंढपाळांनी दिली वाघाशी झुंज, अखेर...
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 9:15 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव यांचा संघर्ष नेहमीचा भाग झाला. कधी वाघ मानवाचा बळी घेतो. तर कधी मानवाकडून वाघाला प्रत्युत्तर दिले जाते. वाघाच्या हल्ल्यात दर महिन्याला तीन-चार जण मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो. अशीच एक घटना आज समोर आली. यात वाघाने राहुटीत असलेल्या कुटुंबावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी वाघाला पिटाळून लावले. पण, वाघाची मग्रुरी काही कमी होत नव्हती. वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर म्हशीच्या कळपासोबत वाघाची झुंज झाली. वनविभागाला या घटनेची माहिती गेली. ते येईपर्यंत वाघाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघाचा मृत्यू कसा झाला, याचा तपास वनविभागाला करावे लागणार आहे.

झोपेत असताना केला हल्ला

जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एका वाघाने शेतात झोपून असलेल्या मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. मात्र या कुटुंबाने वाघाशी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. मात्र रात्री दीड वाजताच्या सुमारास झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला.

कुटुंबातील तिघेही जखमी

यावेळी बाजूलाच झोपेत असलेल्या पती सुरेश दूरकीवार आणि मुलगा पंकज दूरकीवार यांनी महिलेला वाचवण्यासाठी वाघाशी जोरदार झुंज दिली. या प्रतिकारात दुर्किवार कुटुंबातील तिघेही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर हा वाघ लगतच्या येसगाव शेतशिवारात गेला आणि त्याठिकाणी त्याने गणेश सोनुले या शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला. मात्र गणेश सोनूले याने देखील वाघाचा हा हल्ला परतवून लावला.

रिस्क्यू करण्याआधी शेतकऱ्याचा मृत्यू

त्यानंतर लगतच्या चक-दुगाळा भागात म्हशींच्या कळपासोबत या वाघाची झुंज झाली. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र वाघाला रेस्क्यू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. वनाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. तथ्य लवकरच बाहेर येईल असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.