AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्तांना मदत करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घेतली दखल

एपीआय विशाल राजवाडे हे कर्तव्यावर होते. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पूरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

पूरग्रस्तांना मदत करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घेतली दखल
| Edited By: | Updated on: Jul 21, 2023 | 7:53 PM
Share

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार सुरू आहे. वीज पडून भंडाऱ्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पोलीस तत्पर असतात. पोलिसांना घटनास्थळी जाऊन काम करावं लागते. पूरग्रस्तांना मदत करावी लागते. कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना उरण पोलीस ठाण्या अंतर्गत घडली. एपीआय विशाल राजवाडे हे कर्तव्यावर होते. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पूरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

कर्तव्यावर असताना मृत्यू

पोलीस परिवार या संस्थेनं हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यावार असताना मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत करा.

मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली हळहळ

तसेच अनुकंपा तत्वावर कुटुंबायातील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली. झालेली घटना ही वेदनादायी असल्याचं भावना व्यक्त केली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

यापूर्वीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपलब्ध करून दिला जातो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी सीएम निधीतून मदत केली जाते. कर्करोगाशिवाय ह्रदयविकार, अपघात, गडघा प्रत्यारोपण, किडनी विकार यासाठी अर्ज येत असतात.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.