क्रिकेट खेळण्याच्या वादातून डोक्यात बॅट मारली, 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

रायगडमध्ये क्रिकेट खेळताना मित्राने बॅटने वार केल्याने एका अल्पवयीन मुलाच्या डोक्याला मागील बाजूला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

क्रिकेट खेळण्याच्या वादातून डोक्यात बॅट मारली, 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

रायगड : क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून रायगडमधील पेण येथे रहिवासी सोसायटीतील एका मुलाने मित्राच्या डोक्यात बॅट मारली. यात गंभीर जखमी झाल्याने संबंधित मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रेम मंगेश दळवी (13 वर्षे) असं या मुलाचं नाव आहे. बॅटने वार झाल्याने या मुलाच्या डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाल्याने पीडित मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. ही माहिती कळताच पेणकरांच्या काळजाचा ठोकाच चुकलाय (Death of Children due to Bat hitting on head while playing Cricket in Pen Raigad).

मृत मुलाचे वडील मंगेश रघुनाथ दळवी हे मूळचे मंगरूळ गावचे रहिवासी आहेत. सध्या ते कुटुंबीयांसमवेत पेण येथील कुंभार आळीतील सद्गुरू पार्क या सोसायटीमध्ये राहत आहेत. मंगेश दळवी यांचा मुलगा प्रेम दळवी हा आपल्याच सोसायटीतील मित्रांसोबत शनिवारी (10 जानेवारी) सायंकाळी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये क्रिकेट खेळत होता. सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान मुलांमध्ये खेळण्यातून वाद झाला. या किरकोळ वादातून खेळणाऱ्यांपैकी एका अल्पवयीन मुलाने प्रेम दळवीच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला.

डोक्याच्या मागील बाजूवर बॅटने जोराचा फटका बसल्याने प्रेम गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी जखमी प्रेम दळवीला हॉस्पिटलमध्ये गेले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने प्रेमचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याची माहिती पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

ही दुखद घटना कळताच उपजिल्हा रुग्णालयाबाहेर हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले. या घटनेमुळे पेण तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच क्रिकेटमधील शुल्लक वाद विकोपाला जाऊन एका निरपराध मुलाचा जीव केल्यानं चिंताव व्यक्त करत आहेत.

या प्रकरणी पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदणी क्रमांक 0004/2021 प्रमाणे भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

अंबरनाथमध्ये भरदिवसा दरोडा; ज्वेलर्सवर दरोडेखोरांचा गोळीबार

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या

24 तासांत 3 हत्या! उपराजधानी हादरली, गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगार बेलगाम

Death of Children due to Bat hitting on head while playing Cricket in Pen Raigad

Published On - 9:23 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI