नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या

नाशकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : नाशकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Nashik Minor Girl Gang Rape). नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. चाकुचा धाक दाखवून बलात्कार केल्याची पीडितेच्या आईची तक्रार आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 7 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Nashik Minor Girl Gang Rape).

नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या सात जणांनी चाकुचा धाक दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं आणि एका मुलीचाही समावेश आहे.

Nashik Minor Girl Gang Rape

संबंधित बातम्या :

पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

Jhanvi Kukreja | मुंबईला चक्रावणाऱ्या जान्हवी कुकरेजा मर्डरचे 10 अँगल

जान्हवी कुकरेजाची डोकं आपटून हत्या? त्या रात्री काय घडलं ? पोलीस तपासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा

Budaun | उत्तर प्रदेशात 50 वर्षीय महिलेची गँगरेपनंतर हत्या, 2 संशयित आरोपी अटकेत

Published On - 2:12 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI