जान्हवी कुकरेजाची डोकं आपटून हत्या? त्या रात्री काय घडलं ? पोलीस तपासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा

जान्हवी कुकरेजा खून प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. Jhanvi Kukreja Murder Case

जान्हवी कुकरेजाची डोकं आपटून हत्या? त्या रात्री काय घडलं ? पोलीस तपासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा
जान्हवी कुकरेजा
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 7:52 PM

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खार येथे झालेल्या जान्हवी कुकरेजा(Jhanvi Kukreja) या तरुणीच्या हत्याकांडाने मुंबई हादरली होती. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या घटनेतील संशयित आरोपी श्री जोगधनकर (Shri Jogdhankar) आणि दिया पडाणकर (Diya Padankar) यांच्याबाबत धक्कादायक गोष्टी पोलीस तपासात समोर आल्या होत्या. (Jhanvi Kukreja Murder Case facts revealed in Police Investigation )

त्या रात्री काय घडल?

खार परिसरात भगवती हाईट्स या गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर गुरुवार 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील रहिवाशांसोबत त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईकही सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी मद्यपानही केले होते. मृत 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा ही 22 वर्षीय संशयित आरोपी श्री जोगधनकर आणि 19 वर्षीय दिया पाडणकर यांच्यासोबत पार्टीला आली होती. जान्हवी सांताक्रुझला राहत होती, तर दोन्ही संशयित आरोपी खारचेच रहिवासी होते.

दिया पडाणकर पुन्हा एकदा यश आहुजाच्या घरी

जान्हवी कुकरेजा हिचा खून झाला त्यादिवशी पार्टीचे आयोजक यश आहुजा यांच्या घरी दिया पडाणकर दुसऱ्यांदा गेली होती. तिथे तिनं जेवण केले आणि झोपली. मात्र, तिने जान्हवी बद्दल एकही शब्द काढला नाही. यावेळी यश आहुजांना दियाच्या ओठातून रक्त येत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आहुजांनी दियाच्या वडिलांना बोलावून घेतले. दियाच्या वडिलांनी तिला हिंदूजा रुग्णालयात दाखल केले. यानंतर यश आहुजांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं जान्हवीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यानं ही गोष्ट यश आहुंजाना सांगितली. यश आहुजांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली.

पोलीस काय म्हणतात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश आहुजांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जान्हवी कुकरेजा आणि दिया पडाणकर 8.30 वाजता आल्या होत्या. मात्र, त्या माघारी गेल्या. जान्हवी आणि दिया पडाणकर श्री जोगधनकर याच्यासोबत रात्री उशिरा पार्टीमध्ये परतल्या होत्या. पार्टी सुरु झाल्यानंतर जान्हवी, श्री आणि दिया यांच्यासह तिथे आणखी एक मुलगी उपस्थित होती. त्या मुलीला उलटी होत असल्यामुळे तिला खाली सोडण्यासाठी दिया पडाणकर गेली. दिया माघारी आल्यानंतर श्री जोगधनकर यांच्यातील जवळीक पाहून जान्हवीला राग आला. यानंतर तिनं आरडाओरडा सुरु केल्यानं दियानं जान्हवीच्या थप्पड लगावली.

पोलिसांच्या मते हा सर्व प्रकार इमारतीच्या पाचव्या माळ्यावर झाला. तिथून जान्हवी कुकरेजाची एक चप्पल आणि कानातील रिंग मिळाली आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर पोलिसांना रक्त आणि जान्हवीचे केस आढळले. पोलिसांच्या अंदाजानुसार पायऱ्यांवर लाईट आणि कॅमेरा नव्हता. जान्हवीच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून हे खूनाचे प्रकरण असल्याचे सांगण्यात आले होते.

जान्हवीचा डोके आपटून खून?

पोलिसांनी लावलेल्या अंदाजानुसार जान्हवी कुकरेजाचा मृत्यू डोके भिंतीवर आपडल्यानं झाला असावा. कारण श्री जोगधनकर याचा एक हातही फॅक्चर झाला आहे. पोलीस श्री जोगधनकर याचा हात फॅक्चर कसा झाला याचा तपास करत आहेत. श्रीने जान्हवीला फसवून दियासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा लव्ह ट्रँगल असल्याचं पोलिसांना प्रथमदर्शनी वाटतं. पोलिसांनी श्री आणि दियाला ताब्यात घेतलं आहे. 22 वर्षीय श्री जोगधनकर या प्रकरणात मुख्य संशयित आहे. श्रीच्या डोक्याला आणि पाठीला जखमा झाल्या आहेत.

पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. जान्हवी दोन्ही संशयितांसह मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास पार्टीच्या मध्यातच बाहेर पडताना दिसली. तर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ती इमारतीच्या परिसरातच मृतावस्थेत आढळली. जिन्यावरुन तिला खाली ढकलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडाणकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

(Jhanvi Kukreja Murder Case facts revealed in Police Investigation )

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.