AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन थंडीत हिंदुत्वाच मुद्दा तापला, ‘आता मी मंत्री झालोय..’; विधानसभेत नितेश राणे, अबू आझमी आमने-सामने

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे आणि सपाचे आमदार अबू आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

ऐन थंडीत हिंदुत्वाच मुद्दा तापला, 'आता मी मंत्री झालोय..'; विधानसभेत नितेश राणे, अबू आझमी आमने-सामने
| Updated on: Dec 21, 2024 | 5:42 PM
Share

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून त्या प्रश्नाला उत्तर दिली जात आहेत. परभणीचं प्रकरण, त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचं प्रकरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सभागृहात चांगलंच गाजलं. यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला तर त्यावर बोलताना सत्ताधाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आज हिंदूत्त्वाचा मुद्दा चांगलाच गाजला. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे मंत्री नितेश राणे आणि सपाचे आमदार अबू आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले अबू आझमी? 

साहेब म्हणतात मशिदीत घुसून मारू, का मारणार आमची काय चूक आहे? मी कुराण वाचू देणार नाही, मी स्पीकर बंद करेल. अध्यक्ष मोहोदय हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. इथे सर्व एकत्र राहातात. प्रेम करा असं आमची संस्कृती आम्हाला शिकवते, जेव्हा दिवाळी आणि होळी येते तेव्हा मुस्लीम बांधव हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात. जेव्हा ईद असते तेव्हा हिंदू बांधव मुस्लिमांना शुभेच्छा देतात, असं आझमी यांनी म्हटलं.

 नितेश राणे यांचं उत्तर  

यावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, अबू आझमीजी जे भाईचारा वगैरे बोलत आहेत त्यात चुकीचं काही नाही. पण ते चुकीची माहिती देत आहेत. दुसरी बाजू समजून घेत नाहीत. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर कोण दगड मारतं? आमचे मंदिर कोण तोडतं? हे भाईचाऱ्याचे लेक्चर जर त्यांनी फतवा काढणाऱ्या लोकांना वेळत दिले असतेना तर अशी भाषण देण्याची वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोहोदय त्यांना निट समजून सांगा, आम्हाला त्यांचं भाषण ऐकायचं आहे, आता आम्ही मंत्री झालो आहोत आता आम्ही ऐकणार काही हरकत नाही. पण त्यांनी वस्तुस्थिला धरून बोलाव. खरी परिस्थिती काय आहे? ही महाराष्ट्रातील जनता ओळखते असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...