AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC परीक्षांचा निर्णय आजच, मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार : विजय वडेट्टीवार

परीक्षा नेमक्या कधी होणार याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. (mpsc exam date uddhav thackeray)

MPSC परीक्षांचा निर्णय आजच, मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार : विजय वडेट्टीवार
उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 11, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई : कोरोना संसर्ग लक्षात घेऊन येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभर विरोध झाल्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय होणार आहे. या परीक्षा नेमकी कधी होणार याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. तशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay Wadettiwar) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’वर बोलताना दिली. (decision on mpsc exam date will be taken by today Uddhav Thackeray will talk about athis)

उद्धव ठाकरे स्वत: माहिती देणार

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या तारखेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच निर्णय घेणार आहेत. तसेच ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल माध्यमांना माहिती देतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारला कोंडीत पकडण्याचं काम सुरु

“एमपीएससीच्या परीक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलणार नाहीत. या परीक्षा वेळेवर व्हाव्यात अशी अनेकांची भूमिका आहे. गोंधळ घालून सरकारला कोंडीत पाडण्याचं काम सुरु आहे. एमपीएससी परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबाबत सांगतील. हा निर्णय ते कदाचित आजच घेतील,” असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात सरकारच्या विरोधाला कडाडून विरोध

दरम्यान, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर संपूर्ण राज्यातून सरकारच्या या निर्णयाला विरोध केला जातोय. भाजपने सरकाच्या या निर्णयाला कडाकून विरोध केला असून परीक्षा ही झालीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पुणे, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्तक करत परीक्षा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इतर बातम्या :

हे तर सरकारचे पळपुटे धोरण, एमपीएससी परीक्षेवरुन फडणवीसांची सरकारवर घणाघाती टीका

MPSC Preliminary Exam | MPSC परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

VIDEO | आमच्या कुंदा वहिनी वयस्कर, राजसाहेब एक विनंती करते, महापौरांनी हात जोडले

(decision on mpsc exam date will be tasken by today uddhav thackeray will talk about athis)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.