केसरकर पत्रकारवर भडकले, प्रश्नाचा भडीमार सहन झाला नाही
शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होताच ते पत्रकारांवर चांगलेच संतापले. यावेळी बोलताना त्यांनी बदलापूर घटनेबाबत समिती दोन दिवसात अहवाल सादर करेल असे म्हटले आहे. पुतळ्य़ावरुन कुणीही राजकारण करु नये असे ही त्यांनी म्हटले आहे,

दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होताच ते पत्रकारावर चांगलेच भडकले. पत्रकारांसोबत बोलत असताना ते म्हणाले की, ‘बदलापूर प्रकरणात आम्ही जी समिती नेमली होती. त्यांना अहवाल तयार करायला सांगितला होता. हायकोर्टात एक पीटीशन सुरू आहे. त्यामुळे हा अंतरीम रिपोर्ट सादर करायला सांगितला आहे. ज्यांना निलंबित करायला सांगितले त्यांना केले आहेत. आमच्याकडे जेव्हा प्रकरण येते तेंव्हा आम्ही लगेच निर्णय घेतो. पण समितीचा अहवाल हा गोपनीय असतो. तो सील बंद असतो. तेव्हा तो सगळ्यांसमोर सादर करावा लागतो. येत्या काळात सर्वांना जबाबदार ठरवले जाणार आहे. तुम्ही सुद्धा लोकांचे प्रतिनिधी आहात. तेव्हा जर काही असेल तर आम्हाला नक्की सांगा. सगळी आवश्यक काळजी घेतली जाईल.’
वक्तव्याचा विपर्यास केला
‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी म्हणालो की हे खूप वाईट झाले पण मी म्हटलो होतो की या वाईटातून काही तरी चांगले होते. मी म्हणालो होतो की सर्वात आधी नौदल तयार करणारे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते. सर्वात शेवटी या किल्याचा पाडाव झाला होता. नेव्ही आपल्या देशाचे संरक्षण दल आहे. नेव्हीचा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांना शोभेल असेच काम व्हावे. आमची तर मागणी होती की १०० फुटाचा पुतळा असावा. पहिल्यांदाच नेव्हीने शिवाजी महाराजांचे एक ब्रीद वाक्य सामावून घेतले.’असे केसरकरांनी म्हटले आहे.
राजकारण कोणीच करू नये
केसरकर म्हणाले की, ‘नवा पुतळा लवकरात लवकर उभारला जावा ही माझी मागणी आहे. त्यामुळे मी मुद्दा हा यापूर्वी मांडला होता आणि पुढे ही मांडणार आहे. चांगला पुतळा तयार केला जावा. माझी मागणी मान्य होईल का मला माहित नाही. राजकारण कोणीच करू नये. ज्या पद्धतीने प्रेस घेतली ते राजकारण नव्हते का? यात दोष मुर्तीकाराचा इंजिनियरचा असावा. कोणी असा विचार ही करू शकत नाही. राजकोटच्या घटनेचे मी समर्थन करत नाही.’
‘हा पुतळा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी नेव्हीने घेतली आहे. तरी तुम्ही बोलता याचा अर्थ तुम्हाला नेव्ही बद्दल आदर नाही. उद्धव ठाकरेंबद्दल मी बोलू शकतो पण आदर राखतो. नेव्ही आणि राज्य सरकार मिळून स्मारक बांधणार आहे. पुतळा ते उभारणार आहे. त्यासाठी कोणी मोर्चा काढण्याची गरज नाही. आम्ही ते स्मारक वेगात बांधता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’ असं ही ते म्हणाले