AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी झाशीच्या राणी सारखं लढणार, मी शिवसैनिकचं राहणार…शुभांगी पाटील यांनी फोडली डरकाळी, तांबे यांच्या विजयानंतरही…

सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर शुभांगी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत झाशीच्या राणी सारखा लढा सुरूच राहील म्हणत तांबे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मी झाशीच्या राणी सारखं लढणार, मी शिवसैनिकचं राहणार...शुभांगी पाटील यांनी फोडली डरकाळी, तांबे यांच्या विजयानंतरही...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 03, 2023 | 12:06 PM
Share

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झालेल्या सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांना लढत दिलेल्या शुभांगी पाटील ( Shubhangi Patil ) परभवानंतरही आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलत असतांना आक्रमक बाणा कायम ठेवत झाशीच्या राणीच्या ( Jhansi Rani ) पायाची धूळ नाही पण झाशीच्या राणी सारखं लढत राहणार असल्याचे म्हंटलं आहे. याशिवाय त्यांनी मी शिवसैनिक म्हणून लढले आणि यापुढेही मी शिवसैनिक म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. धनशक्तीच्या पुढे जनशक्ती होती. मात्र, धनशक्तीच्या पुढे जनशक्ती हारली आहे असं शुभांगी पाटील म्हणाल्या आहे.

सामान्य घरातील लेकीला चाळीस हजार मतं पडणं सोपे नाही, ही फार मोठी गोष्ट आहे असं म्हणत सत्यजित तांबे यांच्या विजयावर शुभांगी पाटील यांना जोरदार हल्लाबोल केला आहे.

माझ्या घरात साधा सरपंच कधी मी पाहिलेला नाही. माझा दोन्ही घरात राजकीय व्यक्ती कुणीही नाही. मी लढत होती. शिवसैनिक आणि महाविकास आघाडी म्हणून मी लढली आहे.

माझा लढा यापुढेही सुरू राहणार आहे. झाशीची राणी जशी लढली तशी मी लढणार मात्र मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळ पण नाही असेही शुभांगी पाटील यांनी म्हंटलं आहे.

शुभांगी पाटील यांनी बोलतांना सत्यजित तांबे यांना वारसा आहे मला कुठलाही राजकीय वारसा नाही असे सांगत असतांना शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लवकरच शिक्षकांसाठी आंदोलन करणार असल्याचेही शुभांगी पाटील यांनी म्हंटलं आहे. याशिवाय एकतर्फी निवडणूक होणार असेही काही जण बोलत होते, मात्र मी त्यांना घाम फोडला असेही पाटील यांनी म्हंटलं आहे.

जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मात्र माझा लढा सुरू राहील. नवे पर्व हे वारस्याचे आहे, आता बघू काय करतात म्हणून शुभांगी पाटील यांनी टोला लगावला आहे.

शुभांगी पाटील खरंतर सुरुवातीला भाजपच्या उमेदवार असणार अशी चर्चा होती, मात्र नंतर त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी महाविकास आघाडीच्या साथीने निवडणुकीत रंगत आणली होती.

त्यात सत्यजित तांबे यांनीही निवडणुकीत आपलाच विजय होणार असा दावा केला जात असला तरी शुभांगी पाटील यांनी जवळपास चाळीस हजार मते मिळवून तांबे यांना मोठा धक्का दिला आहे.

सत्यजित तांबे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत असतांना शुभांगी पाटील यांनी दिलेली लढत चर्चेचा विषय ठरत असून सत्यजित तांबे यांच्या विजयानंतरही शुभांगी पाटील यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?