AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Jagtap Case: नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट, झोपेच्या गोळ्या, बॅटने हल्ला, काळी जादू…थोडक्यात बचावलेल्या प्रवीणकडून मोठा खुलासा

पुण्याच्या बारामतीमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. या महिलेचे नाव शर्मिला जगताप असून पतीचे नाव प्रविण जगताप आहे. पतीला जिवंत पुरण्याचा कट उघडकीस आला असून ती आता तुरुंगात आहे.

Pravin Jagtap Case: नवऱ्याला जिवंत पुरण्याचा कट, झोपेच्या गोळ्या, बॅटने हल्ला, काळी जादू...थोडक्यात बचावलेल्या प्रवीणकडून मोठा खुलासा
| Updated on: Aug 14, 2026 | 8:41 AM
Share

पुण्याच्या बारामतीमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. या महिलेचे नाव शर्मिला जगताप असून पतीचे नाव प्रविण जगताप आहे. पतीला जिवंत पुरण्याचा कट उघडकीस आला असून ती आता तुरुंगात आहे. मात्र, रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या पतीने केलेल्या नवीन खुलाशांमुळे या संपूर्ण घटनेला एक नवीन खळबळजनक वळण मिळाले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या पतीने काळी जादू आणि मेडिकल स्टोअरच्या घोर निष्काळजीपणाला जबाबदार धरत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित प्रवीणने माध्यमांना सांगितले, “तिने (माझ्या पत्नीने) मला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मी दोन दिवस झोपलो. तिसऱ्या दिवशी, जेव्हा ती मला बॅटने मारत होती, तेव्हा मला शुद्ध आली. मी तिला मारू नकोस म्हणून विनवत राहिलो, पण तिने ऐकले नाही. मग तिने मला उचलले आणि बाल्कनीतील खड्ड्यात फेकून दिले. जर कामगारांनी पोलिसांना बोलावले नसते, तर आज मी जिवंत नसतो.”

प्रवीणने असाही आरोप केला आहे की, “माझ्या पत्नीने माझ्या आईलाही झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र, मारहाणीदरम्यान आईला शुद्ध आली आणि तिने तात्काळ माझ्या भावाला बोलावले, ज्याने प्रवीणला रुग्णालयात नेले.” पीडितेच्या पतीने जादूटोणा किंवा काळ्या जादूचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रवीण म्हणाला, “तिने 13 आणि 14 जुलैच्या (अमावस्येच्या दिवशी) कॅलेंडरवर ‘नो रिझल्ट’ असे लिहिले होते. प्रिस्क्रिप्शनशिवाय इतक्या उच्च दर्जाच्या झोपेच्या गोळ्या दिल्याबद्दल प्रवीण यांनी मेडिकल स्टोअरच्या मालकावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.” पीडित प्रवीण यांनी पोलिसांकडे अपील केले आहे की, “त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी आमची दोन मुले माझ्या कुंटुंबापासून दूर नेली आहेत. मला भीती आहे की आमच्या मुलांचे आयुष्यही धोक्यात असू शकते, म्हणून मी प्रशासन आणि पोलिसांना मुलांचा ताबा तात्काळ परत देण्याची विनंती केली आहे.”

पत्नी शर्मिला प्रवीण जगतापने तिचा पती प्रवीण जगताप याच्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्या औषधाच्या प्रभावामुळे प्रवीण पुढील दोन दिवस पूर्णपणे बेशुद्ध होता. त्यानंतर, जेव्हा प्रवीणला शुद्ध आली, तेव्हा पत्नीने क्रिकेट बॅटने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. पतीला मारहाण केल्यानंतर, आरोपी महिलेने त्याला पुरण्यासाठी मजुरांकडून तिच्या बाल्कनीमध्ये विटा आणि सिमेंटचा एक चौकोनी खड्डा बांधून घेतला. तिने तिच्या बेशुद्ध पतीला त्या खड्ड्यात ठेवले आणि त्यावर एक जड दगडाची शिळा ठेवून तो कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला. मजुराला बोलवून टाइल्स लावायला सांगितले. मजुर काम करत असताना त्याला संशय आला. तेव्हा कामगारांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रवीणला खड्ड्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

शर्मिलाने असं का केलं यावर ती म्हणाली की, “नवऱ्याने माझी अवस्था एका मोलकरणीसारखी केली होती. बी फार्मसीचे शिक्षण घेऊनही नोकरी करायला बाहेर जाऊ देत नव्हता. कायम मारहाण करत राहायचा. पतीच्या वागण्याने नैराश्यात गेले होते. मुलांनाही सारखी मारहाण करायचा. घरात मोलकरणीसारखं बनवून ठेवलं होतं,” असा आरोप शर्मिलाने केला.

Follow Us
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!