Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Results 2025 : “…आता कोणी रोखू शकत नाही”, भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंचे ट्वीट

दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

Delhi Election Results 2025 : ...आता कोणी रोखू शकत नाही, भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंचे ट्वीट
एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 4:33 PM

Delhi Election Results 2025 : राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले. तर आपला पराभवाचा झटका बसला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होणार असल्याचे निश्चित होताच आता महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच भाजपचेही अभिनंदन केले आहे. “खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!

घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दिल्लीत भाजपचं कमळ फुललं

दरम्यान नवी दिल्लीत ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज दिल्लीत मतमोजणी पार पडली. या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आप पोस्टल तसेच ईव्हीएम मतमोजणीतही पिछाडीवर पाहायला मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.