AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर कारची ट्रकला जोरदार धडक, छत्रपती संभाजीनगरमधील चौघांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील चार व्यावसायिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची कार ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला, ज्यात दोघे गंभीर जखमी झाले. मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी दिल्लीला निघालेल्या या व्यावसायिकांवर काळाने घाला घातला. या घटनेने संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वाशिमजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचाही भीषण अपघात झाला, ज्यात काही प्रवासी जखमी झाले.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर कारची ट्रकला जोरदार धडक, छत्रपती संभाजीनगरमधील चौघांचा मृत्यू
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील अपघातात छत्रपती संभाजीनगरमधील चौघांचा मृत्यू
| Updated on: Jun 26, 2026 | 12:12 PM
Share

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या अत्यंत भीषण अपघात झाला. गुरूवारी सकाळी एका कारची ट्रकला जोरदार धडक बसून हादरवणारा अपघात झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील चौघांचा मत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत. मृत्युमखी पडलेले चौघजण हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून ते व्यावसायिक होते. मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी हे चौघेही दिल्लीला जात होते . मात्र त्याचदरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रवींद्र भागवत काळे (वय 28), संदीप नवनाथ बोरसे ( वय 30 ), सचिन गंगाधर गजभारे ( वय 37 ) आणि राजेंद्र भावराव कवडे (वय 46 ) अशी मृतांची नावं आहेत. तर अब्दुल खलील अब्दुल समद ( वय 30) आणि उमर इस्माईल जहागीरदार (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत.

नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा

मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक रवींद्र काळे यांच्या MH 20 GE 7359 क्रमांकाच्या 7-सीटर कारमधून हे सहाही जण बुधवारी रात्री सुमारे 12 वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. गुरुवारी सकाळी मंदसौर जिल्ह्यातील तितरोद शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरील अवजड ट्रकला पाठीमागून प्रचंड वेगाने धडक दिली. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पुढील भाग अक्षरशः बोनेटपासून पुढील सीटपर्यंत चेंगरला. अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कारमालक रवींद्र काळे यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तातडीने मंदसौरकडे रवाना झाले. या दुर्दैवी घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशिमजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात

दरम्यान वाशिमजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले…दुभाजक ओलांडून बस थेट टिन पत्राच्या दुकानांमध्ये घुसली. चिकन, मटण व पानपट्टीची 3 ते 4 टिन पत्राची दुकाने चिरडली. या दुकानात पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान कोणी उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या ट्रॅव्हल्स अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास