AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sar Tan Se Juda controversy : ज्या शाळेत वाजले ‘सर तन से जुदा’, ती पाडावी लागेल, भाजपा नेते किरीट सोमय्या काय म्हणाले

महाराष्ट्राच्या एका खाजगी शाळेत पाकिस्तानचे 'सर तन से जुदा'हे गीत वाजवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या प्रकरणात पोलिसांनी केस दाखल केली आहे. आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे.

Sar Tan Se Juda controversy : ज्या शाळेत वाजले 'सर तन से जुदा', ती पाडावी लागेल, भाजपा नेते किरीट सोमय्या काय म्हणाले
kirit somaiya (
| Updated on: Jul 04, 2026 | 5:33 PM
Share

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. या व्हिडीओ शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात मुले परफॉर्म करताना दिसत आहेत. काही मुले हातात नकली तलवारी घेऊन ‘सर तन से जुदा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हे गाणे वाजल्याने या प्रकरणात शाळेवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात काल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या सोबत या शाळेचा दौरा केला. त्यानंतर किरीम सोमय्या यांनी ही शाळा सरकारी जमीनीवर उभी असून ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

मूळ गीत पाकिस्तान शायरने लिहिलेले

शाळेची पाहणी केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दावा केला की या शाळेकडे शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता नाही आणि नियमानुसार या शाळेच्या इमारतीला पाडावे लागेल. या शाळेत ‘सर तन से जुदा’ गीतावर नृत्यू केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या शाळेत झालेल्या या गीताच्या निवडीवर आक्षेप घेतले. त्यानंतर पोलिसांना या शाळेवर कारवाई केली आहे. परतूर पोलिसांना या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, एक शिक्षक आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दाखल एफआयआर नुसार काही बाबी वादग्रस्त ठरल्या आहेत. हे मूळ गीत पाकिस्तान शायरने लिहिलेले आहे. या गीताची निवड एका शिक्षकाने केली होती आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा डान्स बसवण्यात आला होता. या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हे सहन केले जाणार नाही

किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या सोबत या शाळेची पाहणी केली. त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. कागदपत्रांची पाहणी केली. शाळेला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की या शाळेला शिक्षण विभागाची रितसर मान्यता नाही.शाळेला सील करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.या प्रकरणात अशा प्रकारचे गीत वाजवले जाणे चुकीचे असून हे सहन केले जाणार नाही.महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे. शाळेत अशाप्रकारे पाकिस्तानचे गीत वाजवणे सहन केले जाणार नाही. बांगलादेशी आणि पाकिस्तानी तसेच अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे या प्रकरणात काय मत आहे, विरोधी पक्षाचे अशा घटनेत शांत बसणे चुकीचे असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा