AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारमधून आले, हातात शस्त्र घेऊन आत शिरले अन्… काँग्रेस नेत्याच्या घरात मध्यरात्री थरार, 90 मिनिटं काय घडलं?

गोंदिया जिल्ह्यातील देवरीत काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरात मध्यरात्री ९ ते १० सशस्त्र संशयितांनी घुसखोरी केल्याने खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

कारमधून आले, हातात शस्त्र घेऊन आत शिरले अन्... काँग्रेस नेत्याच्या घरात मध्यरात्री थरार, 90 मिनिटं काय घडलं?
gondia
| Updated on: May 25, 2026 | 2:45 PM
Share

गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. देवरी नगर पंचायत प्रभाग क्रमांक १५ मधील चिचगड रोड परिसरात राहणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उषा शहारे यांच्या निवासस्थानी ९ ते १० अज्ञात सशस्त्र संशयित युवकांनी मध्यरात्रीच्या सुमारास घुसखोरी केली. या घटनेमुळे संपूर्ण देवरी शहरात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा संपूर्ण थरार घराच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

झायलो कारमधून आले आणि ९० मिनिटे वावरले

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास संशयित युवक एका झायलो कारमधून उषा शहारे यांच्या घराबाहेर आले. त्यानंतर त्यांनी घराच्या कंपाउंड वॉलवरून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या संशयितांच्या हातात घातक शस्त्रे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे संशयित तरुण तब्बल ९० मिनिटे (दीड तास) घराच्या परिसरात आणि आवारात वावरत होते.

वृद्ध महिलेच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

हे संशयित आवारात फिरत असतानाच उषा शहारे यांच्या सासूबाईंना काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवली. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून पकडले जाण्याच्या भीतीने संशयितांनी अंधाराचा फायदा घेत झायलो कारमधून घटनास्थळावरून पोबारा केला. वृद्ध महिलेच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

पुराव्यांचा नाश करण्यासाठी वीज कापली, साहित्य अस्ताव्यस्त

जेव्हा सकाळी शहारे कुटुंबीय जागे झाले, तेव्हा त्यांना घरातील आणि आवारातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. झाडांच्या कुंड्या जमिनीवर पडल्या होत्या. सॅनिटायझरच्या बाटल्या, कपडे आणि इतर साहित्य विखुरलेले होते. संशयितांनी घरात अंधार करून चोरी किंवा इतर गुन्हा सोपा व्हावा, तसेच सीसीटीव्ही बंद पडावे म्हणून घराच्या मुख्य वीज मीटरची ग्रीप (Fuse) काढली होती. मात्र, घरात इन्व्हर्टरची सोय असल्याने सीसीटीव्ही सुरूच राहिले आणि संशयितांचा सर्व प्रताप कॅमेऱ्यात बंदिस्त झाला.

याबद्दल काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या उषा शहारे यांनी प्रतिक्रिया दिली. माझे जनप्रतिनिधी म्हणून काम करताना कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे हे संशयित चोरीच्या उद्देशाने आले होते की जीविताला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने, याचा तपास पोलिसांनी तातडीने करावा. आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी हीच माझी मागणी आहे, असे उषा शहारे म्हणाल्या.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणी देवरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६२ आणि ३३१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पोलीस पथके गठीत करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल,” अशी माहिती देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी दिली आहे. या घटनेमुळे देवरीतील रात्रीच्या पोलीस गस्तीवर आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Follow Us
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!