बीडमध्ये खळबळ, अजित पवार यांनी अचानक घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट धारूरनंतर…

माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता थेट दुसरीकडे गेल्याने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांनी अचानक निर्णय घेतला. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असून प्रचारानिमित्त ते बीडमध्ये होते.

बीडमध्ये खळबळ, अजित पवार यांनी अचानक घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट धारूरनंतर...
Ajit Pawar
Updated on: Nov 29, 2025 | 4:49 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले. आज संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. कोणताही नियोजित दाैरा अजित पवार यांचा नव्हता. यादरम्यान अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. माजलगाव, धारूर येथील सभा संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा हेलिपॅडकडे न जाता मस्साजोगच्या दिशेने रवाना झाला. धारूरनंतर ते बीडकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र अचानक मस्साजोगच्या दिशेने रवाना झाले आहेत.
यामुळे पोलीस यंत्रणेची देखील धावपळ उडाली. कोणाला काहीही माहिती नसल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संतोष देशमुख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोगकडे सकाळपासूनच लोक जात आहेत. त्यामध्येच अजित पवार हे बीडमध्येच होते आणि अचानक त्यांनी मस्साजोगकडे जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांनी काही वेळ संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरही काही आरोप झाली. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. अनेक मोर्चे काढली गेली.

हेच नाही तर जवळपास सर्वच नेत्यांनी मस्साजोगला जात भेट घेतली. संतोष देशमुखांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. अजित पवारांनी या प्रकरणात सुरूवातीला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता. त्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्याकडून परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अजित पवार बराचवेळ कुटुंबियांशी संवाद साधताना दिसले.

आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने म्हटले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी संतोष देशमुख प्रकरणात करावे, असे थेट मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वीच म्हटले होते.