देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा, बारामतीतून सुरुवात

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि सरकारशी भांडून मदत मिळवून देण्यासाठी उद्यापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा, बारामतीतून सुरुवात

बारामती : परतीच्या पावसाने तसंच अतिवृष्टीने राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि सरकारशी भांडून मदत मिळवून देण्यासाठी उद्यापासून (19 ऑक्टोबर) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते बारामतीपासून करणार आहेत. (Devendra fadanvis And pravin Darekar West maharashtra And marathwada Inspection Tour Starting From baramati)

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर एकत्रितपणे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावांना भेटी देऊन तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.

प्रविण दरेकर उद्यापासून चार दिवस पुणे, सोलापूर सांगली आणि सातारा जिल्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस उद्यापासून  तीन दिवसांचा अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देणार आहेत. यामध्ये उद्या 19 ऑक्टोबरच्या पुणे, बारामती जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे फडणवीस यांच्या सोबत उपस्थित असतील.

उद्या 19 ऑक्टोबर सकाळी 8 ते दुपारी 2 च्या दरम्यान विरोधी पक्ष नेते दरेकर हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बारामती, कुरकुंभ, दौंड, भिगवण इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करतील.

प्रवीण दरेकरांचा अतिवृष्टी दौरा-

त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सोलापूरचा दौरा सुरु होणार आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर सायंकाळी ४ वाजता सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेवगाव, ता. पंढरपूर येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 5 वा. पंढरपूर येथील कुंभारघाटाजवळील भिंत कोसळून झालेल्या अपघातस्थळाची पाहणी करतील, तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांची सात्वंनपर भेट घेणार आहेत.

(Devendra fadanvis And pravin Darekar West maharashtra And marathwada Inspection Tour Starting From baramati)

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार; विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

Pravin Darekar | बीडमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर शेतकऱ्यांच्या बांधावर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *