महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

| Updated on: Mar 27, 2024 | 5:08 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडून येणार नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. या जागेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत ते आक्रमक झाले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोकं बाहेर पडतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत’, फडणवीसांची भविष्यवाणी

“महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत, अशी परिस्थिती आहे. अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचा ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्ष घेतलेला आहे. आम्हाला याची सवय आहे. काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल. कारण ते असचं वागतात”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.