मोठी बातमी! फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंची ती मोठी इच्छा पूर्ण, शिंदे पहातच राहिले, महापालिका निवडणुकीपूर्वी मोठं गिफ्ट

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात लवकरच महापालिका निवडणुका देखील लागणार आहेत, त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची मोठी इच्छा पूर्ण केली आहे.

मोठी बातमी! फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंची ती मोठी इच्छा पूर्ण, शिंदे पहातच राहिले, महापालिका निवडणुकीपूर्वी मोठं गिफ्ट
शिंदे, फडणवीस, ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2025 | 3:03 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला देखील वेग आला आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्ष अनेक ठिकाणी स्वबळावरच निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक राजकीय समिकरणं लक्षात ठेवून युती आणि आघाडीचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी तर महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे, तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढत आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी आजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून, भाजप स्वतंत्र्य निवडणूक लढवत आहे. अद्याप महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, मात्र नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होताच राज्यात लगेचच महापालिका निवडणुका होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीपूर्वी आता मोठी बातमी समोर येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे देखील इच्छूक असताना उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टची पुनर्रचना करण्यात आली आहे, आणि या स्ट्रस्टवर उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं जात आहे, या पार्श्वभूमीवर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या ट्रस्टची पुनर्रचना करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

शनिवारी यासंदर्भात राज्य सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यासह आणखी चार जणांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रस्टकडून स्मारकाच्या कामावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री सुभाष देसाई यांना या ट्रस्टच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पराग अलवानी आणि शिशिर शिंदे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना देखील या ट्रस्टमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, कारण सध्या मुळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्याऐवजी या ट्रस्टवर आता उद्धव ठाकरे यांची वर्णी लागली आहे.