AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, कळायला मार्ग नाही, ज्याच्या…

बिहार विधानसभा 2025 चा निकाल लागला असून भाजपा सर्वात मोठा पक्ष बिहारमधील ठरला. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससह आरजेडीचा धुव्वा उडाला. आता पहिल्यांदाच बिहार निकालावर बोलताना उद्धव ठाकरे दिसले आहेत.

बिहार विधानसभा निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, कळायला मार्ग नाही, ज्याच्या...
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 16, 2025 | 2:27 PM
Share

आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे मराठवाडा दाैऱ्यावर होते. यावेळी कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झालीच पाहिजे म्हणताना उद्धव ठाकरे दिसले. यावेळी ते थेट बांधावर पोहोचले होते आणि गावागावात सभा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसले. बिहारमध्ये एनडीए स्वबळावर आली असून भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. कॉंग्रेस आणि आरजेडीचा धुव्वा उडाला. एझिक्ट पोलपेक्षाही वेगळा निकाल बिहारमधून आला. आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

बिहारच्या विजयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, बिहारचाही संघ खेळायला येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकले नाही. जे जिंकले त्यांचं अभिनंदन. निवडणुकीत तेजस्वीलाच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की एआयची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते त्याचं सरकार येत नाही.

पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे. 10 हजार दिले हा एक फॅक्टर आहे. त्याने काही फरक पडला आहे. पण रोज लोक जे भोगत आहेत. त्यांच्या मनातून अजून जात नाही. हरकत नाही जो जिता वही सिकंदर आहे. बहूमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला.

अनाकलनीय गणित आहे. त्यावेळी मुद्दा उचलला होता. मतदार यादीतून 65 लाख नावं वगळली. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का. आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का?  निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.