मोठी बातमी! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, युवा सेनेतील तब्बल इतक्या कार्यकर्त्यांचे राजीनामे, थेट…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. 2 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली . 2 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. काही पक्षातील लोक राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षाची साथ धरताना दिसत आहेत. नुकताच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे ताजे असतानाच जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत मोठा धक्काच ठाकरे गटाला म्हणावा लागेल. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेतील महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू कोळी यांच्यासह 300 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून हा अत्यंत मोठा धक्का ठाकरे गटाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. यामुळेच आगामी काळातील निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद जळगाव जिल्ह्यांत बघायला मिळेल. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केली जात आहेत. राज्यात महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार की नाही? हे स्पष्ट झाले नाहीये.
