Devendra Fadnavis: मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस केंद्रात, मोठ्या फेरबदलाचे संकेत? नवीन जबाबदारी मिळणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. फडणवीस हे तातडीने मुंबईहून दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना ऊत आला आहे. काय आहे याविषयीची आपडेट?

Devendra Fadnavis: मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस केंद्रात, मोठ्या फेरबदलाचे संकेत? नवीन जबाबदारी मिळणार?
देवेंद्र फडणवीस तातडने दिल्लीला रवाना
| Updated on: Oct 07, 2026 | 12:42 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याचवेळापूर्वी तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे दिल्लीतील मंत्रिमंडळात दिसतील अशा चर्चांना उधाण आलेले आहे. खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी अनेकदा तसा उल्लेख केला आहे. देशाच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस मुंबईहून तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवरून परत येताच फडणवीस दिल्लीत पोहचले आहेत. हा तातडीचा दौरा कशासाठी याचीही माहिती समोर आली असली तरी जुन्याच कढीला ऊत आला आहे.

मुख्यमंत्र्यांचं वजन वाढणार?

Loading...

भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काही दिवसांपूर्वी भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात सातत्याने बदलाची चर्चा होत आहे. काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपला 100 हून अधिक जागा मिळवून देणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे फडणवीस यांचे केंद्रातील वजन वाढले आहे. फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा त्यामुळेच होत आहे. त्यात त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मर्जी असल्याने त्यांचे पारडे जड मानल्या जाते.

संसदीय मंडळात लागणार वर्णी?

सध्या दिल्लीत राज्यसभेच्या जागांसाठी खलबतं सुरू आहेत. भाजपने राज्यसभा निवडणुकी दरम्यान एक यादी जाहीर केली आहे. या यादीत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दोन जणांची नावं नाहीत. त्यामुळे त्यांना डच्चू मिळणार असे मानले जाते. केंद्रीय निवडणूक समितीनं उत्तर प्रदेशातून रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि राज्यमंत्री बनवारी लाल वर्मा यांची नावं भाजप उमेदवारांच्या यादीत नाहीत.

दरम्यान भाजपच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संसदीय मंडळात नियुक्त करण्याचा प्रघात भाजपमध्ये सुरू झाला आहे. यामुळेच देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले की, देवेंद्र फडणवीस हे भविष्यात केंद्राच्या राजकारणात जातील असे दावे करण्यात येतात.

दिल्ली दौऱ्याचे कारण काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परवा तातडीने दिल्ली गाठली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळावर आणि दुष्काळी मदतीवर चर्चा झाल्याचे मानले जात आहे. तर त्यासोबतच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पेचावरही चर्चा झाल्याचे माहिती समोर आली. शिंदे यांच्या धावत्या दौऱ्यानंतर आता फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज मुख्यमंत्री फडणवीस मुंबईहून तातडीने दिल्लीला रवाना झाले. जीएसटी परिषदेच्या बैठकीनिमित्त फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्याचे समजते. या दौऱ्यात राज्यातील घडामोडी आणि विधान परिषदेच्या बैठकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us