AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यपान, छेडछाड… भाजपकडून रोहित पवारांच्या आंदोलनावर नवा Video

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थांच्या नावाखाली तुम्ही जो कार्यकर्त्यांचा धिंगाणा आणि धांगड धिंगा घालताय असे म्हटले आहे.

मद्यपान, छेडछाड... भाजपकडून रोहित पवारांच्या आंदोलनावर नवा Video
Navnath Ban Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 1:31 PM
Share

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार रोहित पवार हे लढा देत आहेत. ते गेल्या सात दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले आहेत. आता या आंदोलनाबाबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी विद्यार्थांच्या नावाखाली तुम्ही जो कार्यकर्त्यांचा धिंगाणा आणि धांगड धिंगा घालताय त्याचा पुरावाच आमच्या हाती लागला आहे असे स्पष्ट म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जो धुडगूस आणि धांगडधिंगा रोहित पवार यांच्या आंदोलनात होतोय त्याचा आज पर्दाफाश केला जाणार आहे. रोहित पवारांना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या आंदोलनामध्ये फक्त 20 टक्के विद्यार्थी आणि 80 टक्के तुमचे कार्यकर्त्ये आहेत. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्त्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचे कर्मचारी आहेत. हे विद्यार्थांचे आंदोलन नाही. एमपीएसीच्या विद्यार्थांच्या नावाखाली तुम्ही जो कार्यकर्त्यांचा धिंगाणा आणि धांगड धिंगा घालताय त्याचा पुरावाच आमच्या हाती लागला आहे.

रस्त्यावर आंदोलनाच्या दिवशी धांगड धिंगा

पुढे ते म्हणाले की, रोहित पवार सातत्याने विद्यार्थांचे नाव घेत आहेत आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे असे सांगत आहेत. परंतू हे असे कोणते विद्यार्थी आहेत जे नाईट लाइफला पुण्याच्या रस्त्यावर आंदोलनाच्या दिवशी धांगड धिंगा घालत आहेत. पुण्याच्या रस्त्यावर मध्यरात्री कदाचित मद्यपान करुन तुम्ही जे राडे करताय त्या राड्याचा व्हिडीओच माझ्या हाती लागला आहे आणि या आंदोलनातून रोहित पवार यांच्या आंदोलनाचा पर्दाफाश होणार आहे. आम्हीला एमपीएसीच्या विर्द्यांचा आदर आहे आणि आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या.

पुण्यात हे आंदोलन म्हणजे नाईट लाइफ

सगळ्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही रोहित पवार आपले काही काँग्रेसचे कार्यकर्त्ये हाताशी धरुन एक झुंडशाही निर्माण करण्याचा प्रयत्न पुण्यात करत आहेत. त्याचाच व्हिडीओ आहे. आम्ही सांगत होतो की पुण्यात हे आंदोलन म्हणजे नाईट लाइफ आणि नाईट लाइफचा धांगडधिंगा रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे असे देखील नवनाथ बन म्हणाले.

शिवराज मोरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, व्हिडीओमध्ये युवक काँग्रेसचा नेता शिवराज मोरे हा सुरुवातीपासून एमपीएससी आंदोलनात रोहित पवार यांच्यासोबत आहे. हा शिवराज मोरे 3 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड वाजे पर्यंत आंदोलनाच्या स्थळी उपलब्ध होता. दीड वाजता हा आंदोलन स्थावरुन कोरेगाव पार्काकडे निघाला. कोरेगाव पार्क येथील लेन 7येथे आणखी दोन युवक काँग्रेसच्या नेत्यांसोबत आला. नंतर ते ड्रींक्स करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी केली.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात