उद्धव ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय? देवेंद्र फडणवीस म्हणतात….

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (30 मे) 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली (Devendra Fadnavis on Thackeray government).

उद्धव ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय? देवेंद्र फडणवीस म्हणतात....
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 4:15 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (30 मे) ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली (Devendra Fadnavis on Thackeray government). या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाविरोधाच्या लढाईत कुठे कमी पडतंय? यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं (Devendra Fadnavis on Thackeray government).

“आज सरकारचं अस्तित्व कुठे आहे? आज संपूर्ण महाराष्ट्र अधिकारी चालवत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांमध्ये कुठेही समन्वय नाही. राजकीय नेतृत्वाला अधिकाऱ्यांमधील समन्वय घडवावा लागतो. ते कुठेही होताना दिसत नाही. याशिवाय सोबतचे दोन पक्ष आहेत, ते फक्त हात झटकत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“संकट परिस्थितीत राजकीय नेतृत्वाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. कधी टीका सहन करावी लागते. कधी लोकांना आपला निर्णय पटत नाही, तरीदेखील तो निर्णय घ्यावा लागतो. अशाप्रकारचे कठोर निर्णय घेताना कोणतेही राजकीय नेतृत्व दिसत नाही”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

“राज्य सरकार लॉकडाऊनचं नियोजन योग्य प्रकार करु शकलं नाही. मार्च आणि एप्रिलमध्ये 30 कोटी रेशन कार्ड लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळालं नाही. क्वारंटाईन संदर्भात जे निर्णय घ्यायचे होते, ते घेतले गेले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन संदर्भात आणि काही महत्त्वाच्या व्यवस्था राज्य सरकारला उभ्या करता आल्या नाहीत. मी सातत्याने प्रयत्न करुन, मुंबई महापालिकेच्या मागे लागून बेड्सची माहिती देणारा डायनॅमिक डॅशबोर्ड बीएमसीने तयार करुन घेतला. तो सुरुवातीलाच तयार केला असता तर मुंबईकरांना रस्त्यावर मरावं लागलं नसतं”, असं फडणवीस म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयसीएमआरने जे सांगितलं होतं ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला गेला. कुठेही ते वरळी पॅटर्न वगैरे बोललेच नव्हते. पण राज्य सरकारने स्वत:च न्यूज छापून आणली की, वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार. त्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांनी ते ट्विटदेखील केलं”, अशी टीका फडणवीसांनी केली.

“वरळी पॅटर्नमध्ये सरकारने काय केलं? तर वरळीमध्ये टेस्टिंग पूर्णपणे बंद केली. वरळीच्या खासगी लॅबमध्ये टेस्टिंग सुरु होतं. मात्र, त्या टेस्टिंग लॅब बंद करण्याचे आदेश सरकारने दिले. लपवाछपवी करुन संकट थांबवता येत नाही. आयसीएमआर आणि इंटर डिसिप्लनिरी टिमने सांगितलेल्या नियामांचं पालन केलं गेलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“आयसीएमआरकडून 2 लाख केसेस होणार असा दावा केला गेला होता. पण आता फक्त 60 हजार केसेस आहेत, असं राज्य सरकारकडून सांगितलं जातं. मात्र, आसीएमआरकडून कोणतीही आकेडवारी सांगितली गेली नव्हती. साईक येईल, असा इशारा देण्यात आला होता. पण राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी नको ते स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवत आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

4 हजार बेड्ससाठी डॉक्टर, नर्स नाही

“आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणार हे आयसीएमआर आणि केंद्राकडून आलेल्या पथकाने देखील सांगितलं होतं. पण आपण काय व्यवस्था केली? आम्ही रेस कोर्स, एमएमआरडी, डोममध्ये बेड्स तयार केले, असं सांगितलं जातं. हे सर्व मिळून एकूण 4 हजार बेड्स आहेत. आपल्याकडे रोज दीड हजार रुग्ण वाढत आहेत. त्या 4 हजार बेड्ससाठी डॉक्टर, नर्सेस, नाहीत. त्यामुळे ते रुग्णालयं सुरुच होऊ शकलेले नाहीत,” असेही फडणवीस म्हणाले.

“आयसीएमआरचा चुकीचा दाखला सरकारकडून देण्यात आला. आयसीएमआरने सुरुवातीला सीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं होतं. त्यावेळी आम्ही असिम्टोमॅटिक टेस्टिंग केलं. ज्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि टेस्टिंग सुविधा देशभरात सुरु झाली. तेव्हा आयसीएमआरने असीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं, आम्ही ते केलं नाही. आयसीएमआरने स्पष्टपणे सांगितलं की, जेवढे हायरिस्क कन्टॅक्ट आहेत, त्यांची टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, आम्ही आवश्यकता असल्यास करु, असा निर्णय घेतला,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

वरळी पॅटर्न वगैरे काही नाही, सरकारने बनवाबनवी थांबवावी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना अपयशी ठरले म्हणणार नाही : देवेंद्र फडणवीस 

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.