राणेंना अटक, पटोलेंना का नाही? मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपकार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. अशी टीका त्यांनी केलीय.

राणेंना अटक, पटोलेंना का नाही? मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपकार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल
devendra fadanvis
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 3:25 PM

मोदींबद्दलच्या (Pm Modi) वक्तव्यानंतर राज्यभरातील भाजप नेते नाना पटोलेंविरोधात (Nana patole) आग ओकत असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असते असे वक्तव्य नारायण राणे यांनी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावरून फडणवीस सवाल करत आहेत. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत ? कारवाई का करीत नाहीत ? असा सवाल त्यांनी विचारला आहे,तसेच म्हणून मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ! मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असो टालाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसतेय. पंजाबमध्येपं तप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत. अशी टीका फडणवीसांनी केलीय. तर मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धकमी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधा FIR ही दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

नानांच्या गावात एकही मोदी नाही

त्यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झालंय. आता ते घाबरलेत. चारही बाजूनं टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत. पण कितीही पळ काढला तरी त्यांच्या मनातले विष त्यांच्या ओठावर आलंय. अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केलीय. नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ? एखादा माणूस मी मारू शकतो असं म्हणत असेल तर तो गुन्हाच आहे ! आणि तो दाखल झाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

 

Nagpur Police | चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात; नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी करत होते आंदोलन

Nana patole : सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा