AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस दलासाठी गुडन्यूज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्वीट करत म्हणाले…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५४५९ पोलिसांच्या घरांसाठी १७६८.०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, महाविकास आघाडीने बंद केलेली ही योजना पुन्हा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलासाठी गुडन्यूज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्वीट करत म्हणाले...
devendra fadnavis
| Updated on: May 12, 2026 | 11:55 AM
Share

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित घरांच्या प्रस्तावांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५,४५९ पोलिसांच्या घरांसाठी १,७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला अधिकृत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे हे प्रस्ताव प्रलंबित होते. यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी मागील सरकारवर टीका केली आहे. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना मोठ्या प्रमाणावर राबवली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर ही योजना प्राधान्याने सुरू केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या निर्णयामुळे केवळ पोलीस कर्मचाऱ्यालाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणार आहे. तब्बल ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घरासाठी ‘घरबांधणी अग्रीम’ (HBA) मिळावा म्हणून अर्ज केले होते. महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांची पडताळणी करून आता १७६८.०८ कोटींचा निधी थेट वितरीत करण्यात आला आहे. यामुळे घर खरेदी किंवा बांधकामासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेची अडचण आता दूर होणार आहे.

पोलीस दलाला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या किमतींमुळे पोलिसांना स्वतःचे घर घेणे कठीण झाले होते. तिथे ही शासकीय मदत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच निधीअभावी रखडलेल्या कर्ज प्रस्तावांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासोबतच पोलिसांच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या घराचा प्रश्न सुटल्याने पोलीस दलाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....