AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे.

Devendra Fadnavis: कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप
कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 4:37 PM
Share

गडचिरोली: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे. कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत (sanjay raut) तो शब्द नेहमी वापरत असतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हे सरकार देत नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तसेच हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीपासून झाली. कारण, गडचिरोलीपासून बुलंद होणारा आवाज हा क्रांती घडवितो. धानाला बोनस, कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसूल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकारला बेवड्यांची चिंता

बारमालकांची फी 50 टक्के कमी केली. पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्‍यांचे वीजबिल 50 टक्के कमी करावं असं त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण, शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नाही. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे, अशी टीका त्यांनी केली.

सामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला

धानाचे पैसे किती जिल्ह्यांना द्यायचे. विदर्भातील 5 आणि कोकणातील 3 जिल्हे. पण, हे 125 कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष 400 कोटींचा भ्रष्टाचार करतो. काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठित सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा हल्ला त्यांनी केला.

आदिवासींच्या तोंडचा घास पळवणारे सरकार

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सामान्यांचा विचार करीत नसले तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सरकार सामान्यांचा विचार करते. त्यांच्याकडून अधिकाधिक मदत प्रत्येकाला मिळते आहे. राज्यातील आघाडी सरकारने आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

तोपर्यंत आरक्षण संपू देणार नाही

मतांसाठी ओबीसींचा वापर करतात. ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तयार केला. मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे. भाजपाचा कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे आरक्षण संपू देणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातम्या:

Video Devendra Fadnavis | राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका, गडचिरोलीतून भाजपचा जनआक्रोश मोर्चा

Arvind Sawant: मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीका

मोठी बातमी! पाकिस्तानची बोट भारताच्या हद्दीत घुसली, BSF जवानांकडून बोट जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.