AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Sawant: मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीका

महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे.

Arvind Sawant: मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीका
मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 3:57 PM
Share

नवी दिल्ली: महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. राज ठाकरे (raj thackeray) यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. शिवसेनेनेच भाजपशी असलेली युती तोडल्याचा दावा राज यांनी केला होता. केवळ सत्तेसाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती. तुमच्यात जर काही फॉर्म्युला ठरला होता तर तो तुम्ही जाहीरपणे का सांगितला नाही? बंद दाराआड चर्चा करण्याची गरज काय होती? असा सवालही राज यांच्याकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी राज यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

अरविंद सावंत यांनी यावेळी मनसेचे नेते संदीप देशापांडे यांच्यावरही टीका केली. संदीप देशापांडे सोडा. ते फक्त पांडे आहेत, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले म्हणून काही फरक पडत नाही. फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून एकमेकां साह्य करू सुरू आहे. फडणवीस हे अनाजीपंत झालेत. ते फडणवीस राहिले नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

कंबोज यांचं बोझं कुठं अडकलं?

यावेळी त्यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली. कंबोज यांचं बोझं कुठं अडकलं होतं? कश्मीर फाइल्स बघून देशात दंगा व्हावा असा प्रयत्न होता. आताही भोंगे वाटत आहेत. कंबोजचा बोज कुणी आडवला होता, कंबोजच काय सामाजिक काम आहे ? पैशांमुळे तुम्ही त्याच्या मागे लागतात, अशी टीकाही त्यांनी केली.

दरेकरांच्या चौकशीत वाईट काय?

नितेश राणे आणि कंपनी सरड्यापेक्षा वाईट रंग असणारी ही माणसं आहेत. ईडीपासून पळालेली ही सगळी माणसे आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला. दरेकर यांची चौकशी यामध्ये काय वाईट आहे? ते मजदूर आहेत किंवा आणखी जे काय असेल ते महाराष्ट्राला, देशाला कळू देत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Pravin Darekar: नियमबाह्य प्रश्न विचारले, पोलिसांवर दबाव होता, प्रवीण दरेकर यांचा दावा

Nitesh Rane: राऊतांसारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं?; नितेश राणेंचा सवाल

Maharashtra News Live Update : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.