AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Aggarwal Murder : केतन अग्रवाल प्रकरणात आता उज्वल निकम यांची एन्ट्री, फडणवीसांचा मोठा निर्णय, सियाच्या अडचणी वाढल्या

18 जून रोजी केतन अग्रवाल या पुण्यातील तरुणाची लोहगडवरून ढकलून हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी पत्नी सिया गोयलनेच त्याची हत्या केली असा आरोप आहे, आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Ketan Aggarwal Murder : केतन अग्रवाल प्रकरणात आता उज्वल निकम यांची एन्ट्री, फडणवीसांचा मोठा निर्णय, सियाच्या अडचणी वाढल्या
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 3:33 PM
Share

18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून पडून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातील तो फोटो काढण्यासाठी गेला आणि त्याचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलीस चौकशीनंतर या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयलने आणि तिच्या प्रियकराने केतनला लोहगडावरून 400 फूट खोल दरून ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला अटक देखील करण्यात आली आहे, तसेच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. दरम्यान केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत सीएमओकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.

‘लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.’  असं ट्विट महाराष्ट्र सीएमोच्या वतीनं करण्यात आलं आहे.

सियाच्या भावाची पोलिसांकडून चौकशी 

दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याची गेल्या दोन तासांपासून चौकशी सुरू आहे. याबाबत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली आहे. ‘सियाचा भाऊ साहिल गोयलला लोणावळा पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलवलं आहे,गेल्या काही तासापासून त्याची चौकशी सुरू असून, जबाब नोंदणी सुरू आहे.  साहिल गोयल आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितत देत आहे. सध्या आरोपीच्या संदर्भात जो तपास आहे तो सुरू आहे, कागदोपत्री पुरावा जमा करण्याचं काम सुरू आहे. अग्रवाल कुटुंबातील सदस्यांनी जे आरोप केले आहेत, त्या दृष्टीने गांभीर्याने तपास सुरू आहे, अशी माहिती यावेळी दिनेश तायडे यांनी दिली आहे.

Follow Us
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...